समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यास विधी सेवा समिती सज्ज
मा.सर्वोच्च न्यायालय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांच्या आदेशाने तालुका विधी सेवा समिती देऊळगाव राजा यांचे मार्फत कायदेविषयक जनजागृती व नागरिकांचे सशक्तीकरण सप्ताह साजरा करण्यात आला असे की
आज दि 9-11-2022 रोजी देऊळगाव राजा पंचायत समिती येथे तालुका विधी सेवा समिती तथा देऊळगाव राजा तालुकावकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते ,सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी देऊळगाव राजा दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा श्री शैलेश कंठे साहेब होते यांचा सत्कार कृषी अधिकारी श्री डवंगे यांनी केला तर, प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे अध्यक्ष ऍड डाखोरकर यांचा सुद्धा सत्कार करून सन्मानित करण्यात आले तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी अधिकारी मा डवंगे साहेब,ऍड अनिल शेळके सहाय्यक सरकारी अभियोक्ता ,वकील संघाचे जेष्ठ विधिज्ञ ऍड प्रदीप घेवंदे ,ऍड सुजित कुलकर्णी ,ऍड गजभिये ,ऍड मंजुश्री तिडके,खरात मॅडम समाजसेविका ,ऍड मनिष कापसे ,ऍड शिंदे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात बचत गटाच्या महिला तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या कार्यक्रमात ऍड सुजित कुलकर्णी यांनी जेष्ठ नागरिकांचे अधिकार व मध्यस्थी बाबत ,ऍड अर्चना गजभीए यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा तर ऍड अनिल शेळके सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी लोकन्यायालय म्हणजे काय? लोकन्यायालायचे फायदे या बाबद उपस्थित नागरिकांना कायदे विषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा न्यायाधीश शैलेश कंठे यांनी अध्यक्षीय भाषणात राज्य घटनेबाबद कलम 39(अ) या बाबद उपापोह करून समाजातील सर्व घटकांना विधी सेवा समिती मदत करण्यास सज्ज आहे असे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वकील संघाचे प्रवक्ता ऍड अशोक शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड सचिन भालेराव यांनी केले.