
शेगाव – संत नगरी शेगाव चे माजी नगराध्यक्ष व संत गजानन महाराज संस्थान चे कार्यकारी व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . गत तीन दिवसापासून मल्टी ऑर्गन फेलीवर मुळे श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता तसेच त्यांना oxygen लावण्यात आले होते त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यावर घरीच वरिष्ठ डॉक्टरच्या मार्गदर्शनात संपूर्ण मेडिकल सेट अप चा उपचार सुरू होते शिवशंकरभाऊ आयुष्यभर आयुर्वेदिक उपचार यालाच प्राधान्य देत असत त्यामुळे त्यांच्या प्रकृती संदर्भात तिथे आयुर्वेद तज्ञांनाही बोलवण्यात आले ते त्यांच्यावर आयुर्वेद तज्ञ हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत गेल्या पाच ते सहा महिन्यापासून शिवशंकरभाऊ हे आजारी होते .
यावेळी हृदयाचा त्रास त्यांना झाला त्यावेळी त्यांच्यावर शेगाव मध्येच उपचार करण्यात आले . मंगळवारी सकाळी शिव शंकर भाऊ यांची प्रकृती स्वस्थ बद्दल समाज माध्यमांमध्ये अफवा पसरली शिवशंकर भाऊ यांच्या प्रकृतीबाबत समाज माध्यमावर माहिती प्रसारित झाल्याने भाऊंवर प्रेम करणाऱ्यांनी एकच गर्दी केली त्यामुळे नियंत्रण ठेवण्यासाठी व भक्तांना आवरण्याची वेळ प्रशासनावर आली होती आज शेवटी शिवशंकरभाऊ पाटील यांनी अंदाजे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला व शिवशंकर भाऊ यांच्यावरती शासनाने ठरवुन दिलेल्या निकषानुसार कुटुंबांच्या उपस्थितीत आज सायंकाळी ६.३० ला अंत्यविधी होणार अशी माहिती आहे .