किनगावराजा सचिन मांटे – किनगावराजा येथील शेतकरी विजय शंकरराव गवारे यांच्या शेडनेटमध्ये शिमला मिरची लावलेली होती . या शेडनेट मध्ये ८ नोव्हेंबर रात्री उशिरा अज्ञात कोणीतरी आग लावली . या आगीत शिमला मिरची या पिकाचे नुकसान तर झालेच पण शेडनेटसह साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे शेतकरी विजय शंकरराव गवारे यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय किंगवराजा येथीलच उत्तम रंगनाथ गवारे यांच्या शेडनेटमध्ये टोमॅटो चे पीक होते. या आगीत त्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दुर्दैवी घटना काल, ८ नोव्हेंबरला रात्री उशिरा कुणीतरी आग लावली.
शेतातच झोपलेल्या शेतकऱ्यांच्या मध्यरात्रीच ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी अाग विझविण्यासाठी धावपळ केली . पण तोपर्यंत सारे शेडनेट जळून गेले होते . आज सकाळी घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. तलाठ्यांनीही झालेल्या नुकसानीची पाहनी केली. दोनही शेतकऱ्यांचे अज्ञाताच्या खोडसाळ वृत्तीमुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले . टोमॅटो आणि शिमला मिर्चीचे सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेणारे विजय शंकरराव गवारे व उत्तम रंगनाथ गवारे यांचे शेडनेटसह पीक गेल्यामुळे खूप नुकसान झाले .