महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचं मोठ योगदान राहिलं आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक मोठ्या प्रसंगांना त्यांनी तोंड दिलं. अनेक गुणगौरवासांठी पवारांच नाव घेतलं जातं. तसंच पवारांनी केलेल्या राजकीय खेळ्यांमुळं त्यांना दुषणं ही दिली जातात. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांना मुख्यमंत्रीपदावरुन बाजूला सारत पवार मुख्यमंत्री झाले होते. पवारांच्या या राजकीय चालीचा उल्लेख पवार समर्थक आणि पवार विरोधक वेगवेगळ्या अर्थाने करतात.

काही जण पवारांना राजकारणातले चाणाक्य समजात तर काही जणांना शरद पवारांनी (Sharad Pawar) वसंतदादांच्या पाटलांच्या पाठीत तेव्हा खंजीर खुपसला असं वाटतं. नेमकं ते प्रकरण होतं काय? यात शरद पवारांची भूमिका काय होती? महाराष्ट्राच्या राजकारणाला यामुळं काय मिळालं? यासाठी पुलोद ( पुरोगामी लोकशाही दल ) चा प्रयोग व आणीबाणी नंतर ची परिस्थिती समजावून घ्यावी लागेल .चला तर पाहूयात.
Amol Bhat 9970744554
आणीबाणीत जनतेने सतत केलेल्या तीव्र विरोधाने इंदिरा गांधी अखेर नमल्या. १८ महिन्यांनी आणीबाणी अंशत: उठली. मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. याच काळात तुरुगातच स्थापन झालेल्या जनता पक्षाला जनतेने देशभर अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या जनता लाटेत इंदिराजींसह काँग्रेस पक्ष पराभूत झाला. काँग्रेसच्या या पराभवानंतर पक्षात फूट पडणे अपरिहार्य होते. अवघ्या १०- ११ वर्षात इंदिरा गांधींमुळेच काँग्रेस दुसऱ्यांदा फुटली.
१९६९ मधे सिंडीकेट व इंडिकेट असे विभाजन झाल्यावर सिंडीकेट काँग्रेस संपली. आता स्वर्णसिंग काँग्रेस उभी राहिली. इंडिकेटची सरळ इंदिरा काँग्रेस झाली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व शरदराव हे नेते स्वर्णसिंग काँग्रेसमध्ये राहिले. इंदिराजींच्या एकाधिकारशाहीला या सर्वांचा विरोध होता. आणीबाणीही या नेत्यांना मान्य नव्हती. महाराष्ट्रातील इंदिरा काँग्रेसचे नेतृत्व नासिकराव तिरपुर्डेकडे गेले.
वर्षभरातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. विदर्भात इंदिरा काँग्रेसने मोठे यश मिळवले. पण इतरत्र मात्र मार खाल्ला. यशवंतराव, वसंतदादा, शरदराव या त्रिकुटामुळे पश्चिम महाराष्ट्रात स्वर्णसिंग काँग्रेसने मोठे यश मिळवले. कोकण, खान्देश, मराठवाड्यातील काही भागात जनता लाटेने आपला प्रभाव टाकला. परिणामी विधानसभा त्रिशंकू झाली. महाराष्ट्रात जनता पक्षाचे राज्य येऊ नये म्हणून दोन्ही काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन झाले.
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री अशी तडजोड झाली. संयुक्त सरकारचा अनुभव अजिबात चांगला नव्हता. वसंतदादा व तिरपुडे यांची दोन समांतर सरकारे चालू होती. तिरपुडेंनी बेलगाम वक्तव्ये करायला सुरुवात केली. केंद्रात विरोधी पक्षनेते असलेले ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शरदराव यांच्याविरूद्ध तिरपुडे वाट्टेल ते बोलू लागले. तिरपुडेंना हे सरकार चालवण्यात काहीच रस नव्हता हे स्पष्ट दिसत होते …