बुलढाणा – आयुष्याचे साठ वर्ष शरद पवार साहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचे एक ध्येय घेऊन सातत्याने कार्य करीत आहेत. यामध्ये आलेल्या अनेक संकटांशी दोन हात करत स्वाभिमानी महाराष्ट्राची जरब दिल्ली दरबारात दाखवत अविरत कार्य करीत आहेत. आजही वयाच्या 83 व्या वर्षी स्व कष्टाने निर्माण केलेला पक्ष फुटी नंतर आत्मविश्वासाने मैदानात लढत आहे. काही लोक त्यांच्या वयाच्या संदर्भात भाष्य करतात परंतु शरद पवार ही एक व्यक्ती नसून आदर्श विचारधारा आहे. विचारधारेचे कधीही वय होत नसते असे मत नरेश शेळके जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी यांनी दिनांक 20 ऑगस्ट रोजी बुलढाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकी प्रसंगी व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सौ रेखाताई खेडेकर तर प्रमुख उपस्थित दुसरे कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटील हे होते.
यावेळी अध्यक्ष भाषणातून जिल्हाध्यक्ष, रेखाताई खेडेकरांनी सांगितले की निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ देत पक्ष संघटना मजबूत केल्या जाईल. जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितले की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपेक्षित घटकांना केंद्रबिंदू माणिक कार्य करावे. याप्रसंगी विधानसभा क्षेत्राध्यक्ष डॉ. शरद काळे, विभागीय महिला अध्यक्ष डॉ.ज्योतीताई खेडेक, जिल्हा उपाध्यक्ष बी टी जाधव, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. रिजवान शहराध्यक्ष अनिल बावस्कर ,शहर कार्याध्यक्ष सत्तर भाई, राजूभाऊ गवई, सुशील इंगळे, तुळशीराम काळे,विजयाताई कोळसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीएम जाधव यांनी केले .
यावेळी बी टी जाधव यांची राष्ट्रवादीचे जिल्हा महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी अनेक महिला तथा युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.याप्रसंगी माजी सभापती लक्ष्मी नरेश शेळके, भगवानराव शेळके जनार्दन सुसर डॉ. ज्ञानेश्वर गावंडे, डॉ. निलेश राऊत ह भ प शंकर महाराज श्रीकृष्ण डुकरे, सुनील सोनवणे, गणेश कोरके, अनिल माळी, गणेश कड, पांडुरंग नरोटे, विनोद इंगळे एडवोकेट मिसाळ, चित्ते सर, गजानन मुळे उषाताई चाटे, संगीताताई सवडतकर, शारदाताई उबरहंडे, रूपाली शेळके, विनोद गवई, रवी मोरे, संतोष पवार, अशोक हिवाळे, संदीप बोर्डे, अतिश बिडकर, मनोज चंदन, लोकमान कुरेशी यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते