श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित, स्थानिक श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती येथे दि. २० ऑगस्ट २०२१ रोजी कृषि विद्यापीठ शहिद दिनाचे तसेच माजी दिवंगत पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचे जन्मादिवसानिमित्य सद्भावना दिनाचे आयोजन श्री शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना द्वारा करण्यात आले होते.
कृषि विद्यापीठाची स्थापना विदर्भात व्हावी यासाठी पेटलेल्या जनआंदोलना दरम्यान झालेल्या गोळीबारामध्ये ज्या आठ हुतात्म्यांचा बळी गेला त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘कृषि विद्यापीठ शहिद दिन’ हा कार्यक्रम दरवर्षी २० ऑगस्ट रोजी घेण्यात येतो. कोविड चे संकट लक्षात घेता शासकीय नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला होता . सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ नंदकिशोर चिखले यांनी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख, स्व. राजीव गांधी व कृषि विद्यापीठ शहिदांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी स्व. राजीव गांधी यांच्या जीवनाचे अनेक पैलू उपस्थितांना सांगितले तसेच स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता विदर्भात विद्यापीठ निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन सर्व आंदोलकांचे त्यांनी आभार मानले.
यानंतर उपस्थितांनी सद्भावना दिवसाची शपथ घेतली व शहिदांना पुष्पार्पण करून आदरांजली अर्पण केली.संचलन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ दीपक पाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. सुलभा सरप, डॉ. आरती चोरे यांनी परिश्रम घेतले.