मागील एका आठवड्यापासून कोकण परिसरात पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या या थैमानामुळे कोकण येथील महाड, चिपळून, खेड, सुतारवाडी, तळीई, पोलादपूर, आदी ठिकाणी महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळून मध्ये तर सातत्याने ढगफूटी सारखा पाउस झाल्याने सर्व सामान्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यापावसातच दरड कोसळत असल्याने अनेकजन मृत्युमुखी पडली आहेत. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या परिसरात पाहणी दौरा देखील केला. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिका-यांना मदत पाठविण्याचे आवाहन केले. या आवाहानाला प्रतिसाद देत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गायकवाड यांनी बुलडाणा येथून तब्बल 4122 किलो धान्य कोकण येथे पाठविले. धान्य घेवून जाणा-या वाहनाला बुधवार सायंकाळी त्यांच्या मातोश्री संपर्क कार्यालय परिसरात हिरवी झेंडी दाखविली.
यंदा कोकण परिसरात पावसाने अक्षरशा हाहाकार उडविला आहे. आस्मानी संकट बनून आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये दोन दिवस अक्षरशः थैमान घातले. त्यात संपूर्ण बाजारपेठ व लगतचा गजबजलेला परिसर उद्धवस्त केला. या पावसामुळे फक्त चिपळून मध्ये सुमारे ५०० कोटीहून नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. रायगडातील महाड तालुक्यात तळीई गावावर दरड कोसळल्याने जवळपास ३८ जणांचा बळी गेला असून, अद्यापही ४० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. तर, पोलादपूमध्येही दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४९ जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला असून, अद्याप बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी जिल्हयातून मदतीसाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात मेहकर येथून सुमारे 50 लाख रुपयाचे धान्य असलेल्या 13 वाहने गुरुवारी कोकणकडे रवाना होणार आहेत ज्यांना खासदार प्रतावराव जाधव हिरवी झेंडी देणार आहे. या अनुशंगाने बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत व पदाधिका-यांनी पुढाकार घेवून आपला खारीचा वाटा म्हणून बुलडाण्यातून तीन वाहनात सुमारे 10 लाख रुपयाचे 4122 किलो धान्य तीन आज रवाना केले आहे.
या वाहनात मदतीच्या रुपात 1000 किलो गहू, 3000 किलो तांदूळ, 400 किलो तेल, 250 किलो मीरची पावडर, 1500 किलो साखर,1250 किलो दाळ,2000 किलो मीठ, 100 किलो हळद व 25 किलोचे 50 पॅकेज जे ज्यात सर्व साहित्याचा समावेश आहे ती पाठविली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, तालुका प्रमुख लखन गाडेकर, गजेंद्र दांदडे, धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष मृत्युंजय गायकवाड, युवासेनेचे श्रीकांत गायकवाड, मोहन पराड, ओमसिंग राजपूत, आकाश दळवी, स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे, अनुप श्रीवास्तव, संतोष शिंगणे, प्रवीण जाधव, ज्ञानेश्वर खांडवे, नयन शर्मा, नितीन राजपूत आदी पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अडचणीच्या काळात मदत करणे शिवसेनेचा धर्म आ. गायकवाडकोकण विभाग मागील काही दिवसापासून पर्यावरणाच्या माध्यमातून गंभीर संकट निर्माण झाले आहे. या ठिकाणी ढगपुष्टी झाली आहे. कोकण मधील महाड, तळीये. चिपलून, खेडी आदी ठिकाण या पावसाने भक्ष्यस्थानी पडली आहेत. अनेकांची घरे उध्दस्त झाली आहे. लोकांचे हाल होत आहे. ही परिस्थिती कोणावर ही येवू शकते. आज ही परिस्थिती आपल्यावर नाही हे आपले नशीय मात्र अडचणीच्या काळात मदत करणे हा शिवसेनेचा धर्म आहे. यासाठी आणखी मदत लागली तरीही मी तयार आहे व आपण ही अशा प्रसंगी कोकण मधील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी तयारी करावी.
या मार्गाने जाणार मदत..बुलडाणा येथून कोकणसाठी रवाना होणारे वाहन दुलडाणा, औरंगाबाद, पुणे, मार्ग सातारा, कराड, पाटणरोड, चिपळून, हुमरा घाट, कोयना नगर, घाट मार्ग, कुंबळे घाट, फोफळी, खेर्डी मार्ग जाणार आहे.