चितोडा गावातील दोन कुटूंबीयातील वाद निवळला म्हणून माझे ‘अस्त्र, शस्त्र व दहा हजाराची फौज’ हे शब्द मागे : आ.संजय गायकवाड बुलडाणा
बुलढाणा – खामगाव तालुक्यातील चितोडा या गावात हिवराळे कुटूंबात पोत्या व देव्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी एका शेतकरी हिंदु कुटूंबावर शस्त्रासह हल्ला करुन त्यांचे घर जिवंत कुटूंसह पेटवून दिले. लहान मुलांना मारहाण करुन वाघ कुटूंबीतील सुनेच्या बद्दल अश्लिल शब्द बोलुन सागरच्या आईला लोटपाट केली. एवढ्यावरच न थांबता घरातील दागदगीने, सामान चोरुन नेले. हा अन्याय पाहल्यानंतर मी अस्त्र, शस्त्र व दहा हजाराची फौज घेऊन येईल, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य भावनेच्या भरात दिले आहेत. मात्र आता चितोडा गावातील दोन कुटूंबातील वाद आपसात निवळल्यामुळे मी वक्तव्य मागे घेतो. अशी भुमिका आज 08 जुलै रोजी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या मातोश्री कार्यालयावर आयोजीत पत्रकार परिषदेत मांडली. ते पुढे बोलतांना म्हणाले की, चितोडा गावात हिवराळे कुटूंबातील पोत्या व देव्या हे गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती असून त्यांनी शेतकरी हिंदु कुटूंबावर खोट्या अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करुन त्यांना 25 हजार रुपयांची मागणी केली. ही मागणी पुर्ण न केल्यामुळे त्या कुटूंबावर पोत्या नावाच्या गुंडाने चाकु घेवून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वाघ कुटूंबातील सागर याने त्याचाच चाकु हिसकावला व स्वत: आत्मसंरक्षणाकरीता त्याच्यावर वार केला. त्यानंतर 300 ते 400 समाज बांधवाने एकट्या वाघ कुटूंबाच्या घरावर
हल्ला चढविला. घरातल्या सामानाची लुटमार करुन नासधुस केली. त्या शेतकरी हिंदु कुटूंबातील लोकांना मारहाण केली. घरावरामध्ये महिला मुली असतांना घर पेटवून दिले. घरातील देवी, देवता व छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो पायाखाली तुडविले. जवळपास दिड तास जमावाने शेतकरी कुटूंबावर अन्याय व अत्याचार केला. एकट्या पडलेल्या वाघ कुटूंबीयासाठी कोणीही पुढे आले नाही.
वाघ कुटूंबातील महिला व मुली कडब्याच्या कुटारात व छतावर लपुन बसल्या होत्या. त्यांनाही पकडून मारण्याचा कट या जमावाचा होता. एव्हढी मोठी घटना घडल्यानंतरही पोलिस व अधिकारी कर्मचाºयांनी दोन्ही कुटूंबातील लोकांना अटक केली नाही. दहशतील खाली असलेले त्या कुटूंबाच्या मदतीला 7 ते 8 दिवस कोणीही आले नाही. त्यानंतर मी चितोडा गावात जावून तीथली परिस्थिती पाहिली. घरात झालेली लुटमार, घर जाळण्याचा प्रकार झाला. पोत्या नावाचा गुंड व्यक्ती वाघ कुटूंबातील महिलेच्या अब्रुवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. काही महिला कडब्याच्या भुस्यात लपून बसले होते. भयभीत झालेल्या या कुटूंबीयाच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. त्या शेतकरी कुटूंबीयांच्या घरात लुटमार झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीच्या घरातून 25 हजार रुपये जप्त केले. वेळेवर पोलिसांनी सर्वच आॅपरेशन केले असते तर अनेक आरोपींच्या घरात वाघ कुटूंबीच्या घरातील चोरलेले सामान जप्त करता आले असते. मात्र हे सर्व पाहल्यानंतर वाघ कुटूंबावर मोठ्या प्रमाणावर अन्याय व अत्याचार झाल्याचे दिसून आले. चितोडा गावात हा दोन कुटूंबाचा वाद होता. मात्र हिवराळे परिवाराने हा वादात समाजाला सोबत घेऊन त्या शेतकरी कुटूंबावर अन्याय केला. महाराष्टÑामध्ये 154 जाती मागासवर्गीय समाजामध्ये मोडतात. त्यांना
अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्याअंतर्गत संरक्षण मिळाले आहे. मात्र आजपर्यंत 154 पैकी 153 जातीचे लोक अॅट्रोसिटी अॅक्टचा दुरपयोग करतांना दिसून आले नाही. राज्यामध्ये आतापर्यंत 5 लाख लोकांवर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल झाले आहे. त्यापैकी एकाही व्यक्तीला न्यायालयाने दोषी ठरविले नाही. अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्याचा दुरपयोग करत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात माझी भुमिका राहणार आहे. म्हणून मी प्रतिक्रिया
व्यक्त करतांना त्या हिवराळे कुटूंबातील पोत्या व देव्या यांची दादागिरी मोडून काढण्याकरीता अस्त्र व शस्त्रासोबत दहा हजाराची फौज घेवून येईल. असे विधान केले. हे विधान कोणत्या समाजाच्या व धर्माच्या विरोधात नव्हते. हे फक्त हिवराळे कुटूंबातील गुंडप्रवृत्तीच्या लोकांची दादागिरी मोडून काढण्याकरीता होते. आता चितोडा गावातील या दोन कुटूंबातील वाद निवडल्यामुळे माझे ते वक्तव्य मागे घेतो असे आ.गायकवाड यांनी जाहिर केले.