सिंदखेडराजा :- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या परिषदेच्या बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा ग्रामपंचायत सदस्य सीमा गजानन काळुसे यांची निवड करण्यात आली. सीमा गजानन काळुसे यांच्या निवडीचे पत्र सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते,महिला प्रदेश अध्यक्ष राणीताई पाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड.विकास भाऊ जाधव यांनी दिले आहे.
परिषदेच्या ध्येय धोरणानुसार बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सर्वांगीण ग्राम विकासाबद्दल असणाऱ्या विविध न सुटणाऱ्या अडचणी सरकार दरबारी मांडून त्या सर्वोत्परिने सोडविण्याचा प्रयत्न करणार तसेच सरपंचांच्या न्याय हक्का साठी सुद्धा ह्या माध्यमातून आवाज उठवण्याच काम सरपंच परिषदेच्या माध्यमातून करणार असल्याचे यावेळी सीमा गजानन काळुसे यांनी सांगितले. सरपंच परिषद ही ग्रामविकासाच्या तसेच सरपंचाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारी आक्रमक परिषद म्हणून राज्यात नावारूपास आहे. तसेच या परिषदेच्या माध्यमातून सरपंचांच्या समस्या बरोबरच गावस्तरीय विकासात्मक कामे करण्यासाठी उद्भवणाऱ्या अडचणी बाबत अनेक निर्णय शासनास घ्यायला भाग पाडले आहे. सरपंच परिषदेच्या बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी सीमा गजानन काळुसे यांच्या निवडीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.