गजानन सोनटक्के जळगाव जा ः मारोड (ता. संग्रामपूर) येथील जिल्हा परिषद शाळेमधील शौचालय एका शाळकरी मुलाकडून साफ करून घेतल्याच्या प्रकरणी यापूर्वी तेथील ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले होते. आता त्या शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र भीमराव रोठे व सहायक शिक्षक मुकुंद सखाराम नरोटे यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे .

ही कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केली . निलंबन काळात त्यांना लोणार तालुक्यातील पिंपळनेरची शाळा मुख्यालय म्हणून देण्यात आली आहे.या घटनेची चौकशी सुरू असून, जिल्हास्तरीय समितीचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यानंतर या प्रकरणी आणखी काही जणांवर कारवाई होऊ शकते. मारोड येथे कोरोना विलगीकरण कक्ष तयार करताना एका शाळकरी मुलाकडून शौचालय साफ करून घेण्यात आले होते. या कामाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. दुसरीकडे ग्रामसेवक शिवदे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने जि.प. सीईओंना निवेदन दिले आहे.