गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी उमेश जैन यांनी जळगांव जामोद तालुक्यातील चारबन शाळेला आज दि.8 ऑक्टोबर शुक्रवारी अकस्मात भेट दिली यावेळी शाळेला विविध भेटवस्तू देणगी स्वरूपात देणाऱ्या दाणदात्यांचा त्यांनी सत्कार केला.
बुलडाणा जि.प.चे उपशिक्षणाधिकारी जैन,जळगांव जा. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नारायण फाळके,खेर्डा केंद्रप्रमुख केशरसिंग राऊत,मंगेश भोरसे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी आदिवासी,डोंगराळ भागातील जि.प.शाळा चारबन ला आकस्मित भेट दिली.शाळेच्या संपूर्ण परिसर कमालीचा स्वच्छ व विद्यार्थ्यांचा नीटनेटकेपणा पाहून शिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी चारबन शाळेला पंखे,इन्व्हर्टर, बॅटरी,भेट देणाऱ्या खेर्डा येथील अमोल सौदागर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात समाजातील विविध लोकांना पुढे येऊन शाळांना मदत करण्याचे आवाहन उपशिक्षणाधिकारी जैन यांनी केले.गटशिक्षणाधिकारी फाळके यांनी शाळेचा चढत्या आलेखावर आपल्या भाषणातून प्रकाशझोत टाकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी स्वागत गीताने उपस्थितांची मने जिंकली.यावेळी जैन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अधिकाऱ्यांसह प्रमोद भंसाली,मुख्याध्यापक दांडगे सर,उमाळे सर,मोसंबे सर,गावित मॅडम यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक संचालन व आभार दीपक उमाळे यांनी मानले.