शहर काँग्रेस कमिटी तथा काँग्रेस नगरसेवकांतर्फे तर्फे करण्यात आली जळगाव जामोद शहरातील खेर्डा वेस व वायली वेस येथील स्मशानभूमींची स्वच्छता
जळगाव जामोद – भाजप शासित जळगाव जामोद नगरपालिका शासन/ प्रशासनाला जळगाव जामोद शहराच्या व नागरिकांच्या हिताच्या व आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी निवेदने देऊन व सभेमध्ये सांगून सुद्धा जळगाव जामोद शहरामध्ये साफसफाई कडे हेतुपुरस्पर पणे दुर्लक्ष होत आहे .जळगाव जामोद शहरातील खेर्डा वेस येथील स्मशानभूमी,वायली वेस येथील स्मशानभूमी ,तसेच शहरातील ईतर स्मशानभूमी व दफनभूमी (कब्रस्थान) यांच्या साफसफाई संदर्भात आम्ही अनेक वेळा निवेदने दिली व तोंडी सांगितले परंतु सुस्तावलेल्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही.केवळ पैसे खाण्याची जिथे संधी मिळेल तिथे विकास कामे करण्याचे ढोंग करून कमिशन खाण्याचं काम सत्ताधारी नगराध्यक्ष व संबंधितांकडून केल्या जात आहे.दिनांक 25 जून 2021 रोजी सोशल मीडियावर जळगाव जामोद शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी स्मशान भूमी मध्ये असलेला घाण व कचऱ्याचा व्हिडिओ वायरल केला तरीसुद्धा न प प्रशासनाला जाग आली नाही.
आम्ही काँग्रेस नगरसेवक व इतर नागरिकांनी मिळून आज दिनांक 26 जून 2021 रोजी स्वखर्चाने स्वमेहनतीने स्मशानभूमीच्या साफसफाईचे काम हाती घेतले असून येत्या दोन दिवसात दोन्ही स्मशानभूमींचे साफसफाईचे काम पूर्णत्वास येईल असे अशी माहिती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा न प गटनेते अर्जुन घोलप,नगरसेवक तथा सेवादल चे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण केदार व शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेंद्रा बोडखे यांनी माध्यमांस दिली.एवढेच नव्हे या सर्वांनी स्वतः स्मशानभूमीची साफसफाई करून गांधीगिरी पद्धतीने एक प्रकारे भाजपशासित न प प्रशासनाविरुद्ध बंड पुकारले आहे.आता तरी प्रशासन जागे होईल का अशी जनमानसात चर्चा असून येणाऱ्या काळात जनता भाजपशासित न प च्या सद्यस्थितीत असलेल्या अध्यक्ष व संबंधित पदाधिकारी तसेच अधिकारी यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे आहे.