साठेगाव येथील विवाहित शेतकरी महिला वीज पडून ठार,पती गंभीर जखमी
सिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे) तालुक्यातील साठेगाव येथील विवाहित शेतकरी महिला वीज पडून ठार झाली,गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात कडकडाट व वीजांचा कहर झाल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथील रुख्मिनाबाई गजानन नागरे, वय ५० वर्षे ह्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची तर त्यांचे पती गजानन नागरे हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
साठेगाव येथील गजानन संपत नागरे, वय ५५ व त्यांच्या पत्नी रुख्मिनाबाई गजानन नागरे, वय ५० हे दोघे पतीपत्नी शेतात काम करीत होते. त्यातच अचानक दुपारी आलेल्या पावसातुन स्वतःला वाचवण्यासाठी दोघांनी बोरीच्या झाडाचा आसरा घेतला. त्याचवेळी त्या झाडावर वीज कोसळली. ह्या दुर्घटनेत रुख्मिनाबाई ह्या जागीच ठार झाल्या तर गजानन नागरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच किनगावराजाचा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला.
मृत रुख्मिनाबाई यांच्या मृतदेहाचा पंचनामा करीत शवविच्छेदन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे रवाना करण्यात आला आहे.
फिर्यादी अर्जुन पाटीलबा नागरे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन किनगावराजा मर्ग १६/२२,कलम १७४ जा.फो प्रमाणे दाखल असून ह्या संदर्भात पोलीस स्टेशन ला नोंद करण्यात आली आहे
पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे , ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक चिरडे,पो.कॉ. जाकीर चौधरी, नाजीम चौधरी शिवाजी बारगजे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.