गजानन सोनटक्के -स्थानिक कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद द्वारा आयोजित सूनगाव येथील बालाजी मंदिर येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रशिक्षणास प्रमुख म्हणून सुनगाव येथील महादेव धुर्डे पांडुरंग नानगदे आणि अंबडकर उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील विकास जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ, शशांक दाते उद्यानविद्या विभाग तज्ञ उपस्थित होते.
मागील २ते ३ वर्षापासून परिसरातील भागांत मोठ्या प्रमाणात संत्रा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असून शेतकऱ्यांची संत्रा लागवड करण्यापूर्वी वान निवड, जमीन निवड ह्या महत्त्वपूर्ण बाबी समजून घेतल्या. शशांक दाते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नवीन लागवड करताना ज्ञाव्याची काळजी, तसेच उत्पादित बागांची निगा राखणे सांगितले. संत्रा पीक व्यवस्थापन करताना जमीन अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे धडे शेतकऱ्यांना अवगत करून दिले. बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचे बागेतील समस्यांचे निराकरण सुधा तज्ञांमर्फट करून घेतले.
केंद्राचे प्रमुख विकास जाधव यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खत, व इतर जैविक निविष्ठा वापरण्यावर भर दिला. तसेच सर्वांनी आपला संत्रा बाहेरील देशात निर्यात करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजन आणि यशस्वी करण्यासाठी गावचे कृषी मित्र मोहन सिंह राजपूत यांनी हातभार लावला.कार्यक्रमास गावातील बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.