गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार हे जनसेवेसाठी सदैव तत्पर असतात हे त्यांच्या कार्यशैली मधून दिसून आले आहे त्यांनी दिनांक 15 मे रोजी जळगाव जामोद येथील कोवीड सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला त्या ठिकाणी कोविड सेंटरवर कशाचीही कमतरता भासली तर मला कॉल करा मी कोविड सेंटरला कशाचीही कमतरता भासू देणार नाही. तसेच या ठिकाणी रॅपिड टेस्टच्या किट उपलब्ध नसल्यामुळे कित्येक रुग्ण कोविड सेंटरला रॅपिड नसल्यामुळे तपासणी न झाल्यामुळे येऊन गेले होते. तसेच आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी रॅपिड किट बद्दल विचारणा केली असता जळगाव जामोद नव्हे तर संग्रामपूर तालुका आणि शेगाव तालुक्यातही उपलब्ध नव्हत्या. रॅपिड किट सेंटरला तात्काळ उपलब्ध करून द्या असा इशारा त्यांनी बुलढाणा जिल्हा कोविड सेंटरला केला आहे. तसेच शासनाचा निधी उपलब्ध नसला तरी मी स्वतः योग्य ती मदत देणार आहे असे त्यांनी सांगितले त्यांनी जळगाव ग्रामीण रुग्णालय येथेही परिस्थितीचा आढावा घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला पाटील यांना निर्देश दिले. तसेच रुग्णसेवा ही सर्वोच्च सेवा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या मतदारसंघातील कोवीड सेंटरला मी कशाची हि कमतरता भासू देणार नाही गरज पडल्यास स्वतः मदत करणार असेही त्यांनी सांगितले