शेतकऱ्याच्या शेतातच समृद्धी महामार्गचे ‘रॉ’ मटेरियल. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी..! संबंधित विभागाकडुन न्याय मिळेल का?
प्रतिनिधी सचिन मांटे(किनगावराजा) सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई गावातील शेतकरी सुदर्शन रामकिसन सानप यांची शेतजमीन मौजे विझोरा शिवार ता.सिंदखेडराजा गट न. २६७ व मौजे शेलगाव शिवार गट क्रमांक. २२३ यांच्या दोन्ही गटामध्ये यांची मालकी जमीन आहे

त्या लगतच शासनचा समृद्धी महामार्गचे काम सुरु आहे पण शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची नोटीस व माहिती पत्रक व शेतकऱ्यांच्या संमतीविना शेतजमीनत समृद्धी महामार्गचे करोडो रुपयांचे रॉ मटेरियल टाकले गेले,संबंधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी काम अडवून काम बंद करण्याचा प्रयत्न केला,तरी सुद्धा त्याच्या शेतात रॉ मटेरियल डम्प केल्या गेले शेतकऱ्यानी वेळोवेळी निवेदन अर्ज वगरे देऊन आपली समस्या मांडणीचा प्रयत्न केला पण संबधीत अधिकारी वर्ग यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही उलट शेतकऱ्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केले गेले ? अशी प्रतिक्रिया सुदर्शन सानप यांनी ‘मातृतीर्थ live’ शी बोलतांना दिली शेतामध्ये वर्ष २०१७ पासून टाकलेले ‘रॉ’ मटेरियल उचलून घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळेल का ? संबधीत विभागाकडुन कोणती कार्यवाही केली जाते यावर लक्ष आहे.