समाज कल्याण सभापती सौ पुनम ताई राठोड यांनी घेतला आढावा
सिंदखेड राजा – समाज कल्याण विभागाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात प्रथमच समाज कल्याण सभापती सौ पुनम ताई राठोड यांनी समाज कल्याण विभाग अंतर्गत समस्या व अडचणी व विकासात्मक कामासंदर्भात आढावा बैठक घेतली त्या अनुषंगाने सिंदखेड राजा येथे 16 जुलै रोजी पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेतली
समाज कल्याण विभाग अंतर्गत घेतलेल्या आढावा बैठकीत बोलताना समाज कल्याण सभापती सौ पुनम ताई राठोड म्हणाल्या अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास करणे सेस फंड योजनेअंतर्गत दिवाबत्ती जोड रस्ते अपंग कल्याण निधी वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन योजना बीज भांडवल योजना तांडा वस्ती सुधार योजना आंतरजातीय विवाह योजना अपंग विवाह योजना यासह अन्य वर्ग यांच्या समस्या व अडचणी व विकासात्मक कामे यासंदर्भात अधिकारी व कर्मचारी यांनी विनाविलंब कामे मार्गी लावावी कारण समाज कल्याण विभागाचा निधी तात्काळ संबंधित वर्गांना देण्यात यावा विकासात्मक कामासाठी जनतेला त्रास देऊ नका तसेच तळागाळातील लोकांना त्या लोकांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजना पोहोचविण्याचे काम चांगल्या पद्धतीने करा कारण वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि अधिकारी आणि कर्मचारी यांनीसुद्धा या वर्गाच्या कामाला प्राधान्यक्रम देऊन मार्गी लावाव्यात असे त्यांनी सांगितले याप्रसंगी समाज कल्याण सभापती सौ पुनम ताई राठोड यांनी सांगितले अधिकारी व कर्मचारी यांची विकासात्मक कामासाठी हलगर्जीपणा केल्यास गय केल्या जाणार नाही कारण पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या आदेशाने समाज कल्याण विभागाचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले
या आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते राम राठोड पंचायत समिती सदस्य विलासराव देशमुख समाज कल्याण सभापती स्वीय सहाय्यक विजय राठोड समाज कल्याण विभागाचे कर्मचारी सहाय्यक अभियंता के एम ठोंबरे कनिष्ठ अभियंता पी सी चव्हाण समाज कल्याण विभाग बुलढाणा आर जे मोठे समाज कल्याण विभाग बुलढाणा आर डी गवई तसेच समज कल्यान विभग कर्मचारी एस बी नागरे डी एस दराडे आर आर डी लिहिणार एस पी तुरुक माने यांच्यासह आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते