प्रतिनिधी.(किनगावराजा) सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई गावातील शेतकरी सुदर्शन रामकिसन सानप, बालाजी सानप, कडूबा सानप, शिवाजी सानप, यांची शेतजमीन मौजे विझोरा व शेलगाव शिवार ता.सिंदखेडराजा गट न. २२३,१९१, २६७ व मौजे शेलगाव शिवार गट क्रमांक. २२३ यांच्या दोन्ही गटामध्ये यांची मालकी जमीन आहे त्या लगतच शासनचा समृद्धी महामार्गचे काम सुरु आहे पण शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची नोटीस व माहिती पत्रक व शेतकऱ्यांच्या संमतीविना शेतजमीनत समृद्धी महामार्गचे करोडो रुपयांचे रॉ मटेरियल टाकले गेले,
संबंधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी काम वेळोवेळी निवेदन दिले उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, यांनी शेतकऱ्यांचे तक्रारीबाबत राष्ट्रीय महा विकास मंडळ यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रोजेक्ट मॅनेजर रिलायन्स इन प्रोजेक्ट प्रोजेक्ट प्रा. लि तढेगाव कॅम्प यांच्या नावाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बाबत स्थळ पंचनामा करून आपला अहवाल कळवावा, असे संदर्भीय पत्र महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ अभियंता रामदास खलसे यांनी दिले होते, परंतु समृद्धी महामार्गाचे अधिकारी मनोज बोरडे, कवल सिंग यांनी फक्त देखावी पंचनामा केला व शेतकऱ्याला सहा दिवसाची मुदत मागितली मुदत होऊन शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई मिळाली नाही.
मनोज बोरडे हे हे अधिकारी शेतकरी संबंधित असलेल्या अडचणी सोडवण्याकरता यांची नेमणूक रिलायन्स कंपनी कडून झालेली आहे तरी पण शेतकऱ्यांचे तक्रारीचे निवारण यांच्याकडून होत नाही संबंधित अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देतात या रिलायन्स कंपनीच्या समृद्धी महामार्ग व्यवस्थापक महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करून त्या शेतात टाकलेले रॉ मटेरियल हटवून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई करून द्यावी अन्यथा रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा लिमिटेड तळेगाव कॅम्प सिंदखेड राजा येथे (सुदर्शन सानप,विष्णु सानप, बालाजी सानप, कडुबा सानप)आम्ही आमरण उपोषणास बसू आमच्या जीविताची हानी झाल्यास त्याची संपूर्ण जिम्मेदारी रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड तळेगाव कॅम्प सिंदखेड राजा यांचे अधिकारी मनोज बोर्डे व कवल सिंग हे राहतील अशी असे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन किनगाव राजा,यांना प्रतिलिपी असे देण्यात आले.