युवकांच्या मागणीला प्रतिसाद देत डॉ शिंगणे यांनी दिला तात्काळ निधी.
सिंदखेडराजा(सचिन मांटे)- तालुक्यातील रुम्हणा येथील भेटी दरम्यान दि २सप्टेंबर रोजी आमदार(माजी मंत्री) डॉ. शिंगणे हे आले असता नितीन कायंदे व युवकांनी निधीसाठी निवेदन दिले तर शिंगणे यांनी तात्काळ १८ लक्ष निधी मंजूर केल्याचे पत्र तेथेच दिले त्याबद्दल युवकांनी सत्कार केला. याचवेळी युवकांच्या मागणीवरुन विविध विकास कामांसाठी तात्काळ ८ लाख रु. चा निधी तात्काळ मंजूर केला.
रुम्हणा येथील रावसाहेब कायंदे ह्यांच्याकडे सदिच्छा भेटीदरम्यान आ. डॉ. राजेंद्र शिंगणे आले असता येथील युवकांनी गावातील समस्याबाबत त्यांना निवेदन देवून समस्या सांगितल्या त्यांनी जागीच तात्काळ सदर निधी संबधी मंजुरीचे पत्र दिले व सबंधीत विभागाला सुचना केल्या यामध्ये नवीन ग्रामपंचायत भवनासाठी १८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. यावेळी युवकांनी डॉ. शिंगणे साहेबांचा छोटेखानी सत्कार केला. मात्र ह्याच दरम्यान नितीन रावसाहेब कायंदे व इतर युवकांनी गावातील नवीन गावठाण परिसरात समाजोपयोगी कामासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. आ. डॉ. शिंगणे ह्यांनी ती मागणी तात्काळ मंजूर करत निधीचे पत्र युवकांना जागेवरच सुपूर्त केले. याचबरोबर गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळच्या मोकळ्या जागेत समाज मंदिर उभारणीची मागणी देखील युवकांनी केली असता, ती मागणी येत्या काळात लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कामांना सुरुवात करा. त्यानंतर गरजेनुसार पुढील निधी देण्यात येईल, असे आ. डॉ. शिंगणे ह्यांनी आश्वासन दिले.. युवकांनी सुद्धा नवीन गावठाणात विविध विकास कामे नेटाने करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
याप्रसंगी राम राठोड, आत्माराम कायंदे, मधुकर गव्हाड, बी. डी. खरात, रावसाहेब कायंदे, प्रफुल कायंदे, विनोद जायभाये व इतर युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.