किनगाव राजा(सचिन मांटे) प्रतिनिधी. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथील भारतीय लष्कर सेवेत असलेले देवेंद्र काकड काल यांची हवलदार या पदावरून सेवा समाप्ती झाली या लाडक्या भुमिपुत्रा चे किनगावराजा नगरीत आझाद फाउंडेशन च्या वतीने व समस्त गावकरी च्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन केले गेले होते कोरोना चे नियम पाळून आयोजन आयोजन होते सेवानिवृत्त झालेले देवेंद्र काकड यांचे स्वागत किनगाव राजा कर यांनी बस स्थानकावर केली होती त्यानंतर आपल्या गावातील नागरिकांना भेट देत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौक या ठिकाणी नागरी सत्काराचे आयोजन झाले होते.
आझाद फाउंडेशनच्या वतीने व परिवाराकडून पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला नागरी सत्कार निमित्त गावातील माजी सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यानंतर गावातील माजी सैनिकांनी आपल्या भारतीय सैन्यातील आलेले अनुभवाची मांडणी करत उजळा दिला, यानंतर सेवानिवृत्त सैनिक देवेंद्र काकड यांनी आपल्या भारतीय सैन्यात भरती होण्यापासून तर झाल्यानंतर आलेले सर्विस मधले अनुभव गावातील युवकांपुढे मांडले युवकांनी सैन्यात भरती होऊन देश सेवा करावी असे मार्गदर्शन यावेळी देवेंद्र काकड यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन आजाद फाऊंडेशनचे सदस्य शिवानंद काकड, सुखदेव मुंडे राम ढाकणे, गणेश मुंडे, रवी काकड, शिवाजी हरकळ, विनोद काकड, शिवाजी खरात, सचिन मांटे, यांनी केले होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मांटे,व कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाले आभार प्रदर्शन राम ढाकणे यांनी केले.