
समृद्धी महामार्ग खडीमशीन मुळे वागजाई येथील शेतकऱ्यांचे नुकसान किनगावराजा(प्रतिनिधी सचिन मांटे).सिंदखेडराजा तालुक्यातील वागजाई गावातील शेतकरी रमेश नाथजी सानप यांची जमीन समृद्धी महामार्गलगत आहे यांच्या शेताजवळच समृद्धी महामार्गची खडी मशीन सुरु आहे रमेश नाथजी सानप यांचा शेती गट क्रमांक.१५२आहे यालगच शेजारी महसूलच्या असलेल्या क्षेत्रात खडीमशीन सुरु आहे.त्या खडीमशीन मुळे आसपास च्या शेतात खडीच्या धूळमूळे रमेश नाथजी सानप सानप यांच्या शिवार वागजाई गट क्रमांक. १५२ मध्ये असलेल कपाशी पिक धुळीत गेलं कापूस पूर्ण काळा पडला असून बोन्ड गळ झाली यातच शेतकऱ्यांचे अंदाजे १,५०,००० रुपये एवढी नुकसान झाली आहे, रमेश नाथजी सानप यांनी वारंवार अर्ज उपविभागीय कार्यालय ,तहसील कार्यालय सिंदखेडराजा,व्यवस्थापक समृद्धी महामार्ग,यांना निवेदन देऊन सुद्धा अजून या शेतकऱ्यांला मोबदला मिळाला नाही.यावरून शेतकऱ्यांच कुणी वाली आहे कि नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी वर्गास विचारपुस केली उडवा उडवीची उत्तर मिळतात अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी मातृतीर्थ live ला दिली.