“यळकोट,यळकोट”.. जय मल्हार,,,! जयघोशात दुमदुमले हिवरखेडपूर्णा गाव.
प्रतिनिधी सचिन मांटे
सिंदखेडराजा तालुक्यातील पूर्णा नदीकाठी वसलेले हिवरखेड गाव हिवरखेड पूर्णा या नावाने ओळखले जाते गावाला जागृत देवस्थान म्हणुन खंडोबा रायचे मंदिर.गावातील वयस्कर व मातबदार गावकरी यांच्या मते चम्पाशस्टी हा उत्सव खंडोबाराया गावचे आराध्या दैवत यांच्या नावाने गेली अनेक ७० ते ८० वर्षापासून परंपरा सुरु आहे,गावकरी यांच्या मते भक्ती आणि श्रद्धा येथील आसपासच्या परिसरातील खेड्या पाड्यातील लोकांना खेचून आणते,या दिवशी आराध्य दैवताचे पूजन गावात,जेवणाचा भंडारा,छोटी मोठी दुकानें ,संगीत बारी,काही नाटके,विविध कार्यक्रम आयोजित केले जातात,मागील २ वर्ष कोरोना महामारी चे सावट असल्यामुळे यात्रेचे आयोजन झाले नव्हते व साध्या पद्धतीने पूजन वगरे झाले पण भक्तीची परंपरा सुरूच होती यावर्षी नियमांचे पालन करून यात्रा व विविध कार्यक्रमचे आयोजन झालेत पूजन व डफ व भक्ताच्या साथीने “यळकोट यळकोट”,,,,, जय मल्हार,,,! या नादात परिसर दुमदुमन निघाला अनेक राजकीय,सामाजिक,पत्रकार या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर यांनी गावाला यांनी भेट दिली गावातील कार्यक्रमांस गावकरी यांचे सहकार्य उत्साहात भर आणि भक्ती आणि श्रद्धा याचा जोड दिसून येतो.