शेतकरी व खातेदार,व्यापारी,विध्यार्थी यांना ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ पूर्ण सहकार्य करणार- सुरज सातपुते (शाखा प्रमुख किनगावराजा)
प्रतिनिधी सचिन मांटे किनगावराजा येथील बँक ऑफ महाराष्ट्र स्थानिक शाखा यांनी.सोमवार दि. १५ नोव्हेंबर रोजी एक छोटीखाणे कार्यक्रम आयोजित केला होता यात किनगावराजा येथील शेतकरी,डॉक्टर, व्यापारी,विद्यार्थी,यांनी हजेरी लावली,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस स्टेशन किनगावराजा चे दुय्यम ठाणेदार.रमेश बनसोडे यांनी स्वीकारले होते प्रमुख अतिथी किनगावराजा येथील व्यापारी सुभाषरावजी घिके,सुरज सातपुते शाखा प्रमुख बँक ऑफ महाराष्ट्र यांनी स्वीकाराले. या ठिकाणी सातपुते यांनी कोरोना काळात बँक ऑफ महाराष्ट्र ने केलेल्या कामावर प्रकाश टाकला व सगळ्यां टीम चा सत्कार केला तत्पूर्वी दुय्यम ठाणेदार रमेश बनसोडे यांनी मोबाईल वर येणाऱ्या फसव्या कॉल व मेसेज ला बळी न पडता आपण पूर्ण खात्री करून समोरच्या व्यक्तीला आपल्या बँक अकाउंट विषयी माहिती देऊ नये.यापासून ऑनलाईन होणारी फसवणूक टाळू शकतो व एटीएम वर आपली रोकड काढताना आपला पिन अनोळखी व्यक्तीला देऊ नये आपल्या अकाउंटच्या तक्रारसाठी बँकेत संपर्क साधावा असा पोलीसी सल्ला दिला भाषणनंतर स्थानिक व्यापारी यांच्या अडचणी सुभाषरावजी घिके यांनी मांडल्या त्यावर सगळ्यां अडचणीचे निरसन केल्या जाईल व,शेतीविषयक कर्ज,सुकन्या योजना,घर कर्ज,शैक्षणिक कर्ज,छोटे उद्योग,अश्या योजना योग्य पद्धतीने राबविल्या जाईल व खातेदाराना योग्य तो न्याय दिला जाईल असे मनोगत सूरज सातपुते यांनी व्यक्त केले