सिंदखेडराजा (सचिन मांटे)सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील जिजामाता साखर कारखाना येत्या हंगामात सुरु होणार असून तालुक्याला सुवर्ण दिवस येणार आहे,१९७२ साली स्थापन झालेला हा सहकारी साखर कारखाना लवकरच सुरु होईल.राज्य सहकारी बँक यांच्याकडून निविदा देण्यात आली होती
इतर निविदामधून बजरंग बाप्पा सोनावणे यांची निविदा सर्वोत्तम ठरली आहे बीड जिल्ह्याच्या राजकारनातील नावाजलेले चेहरा बीड जिल्हा सभापती त्यांनी दरवर्षी ३ कोटी रुपये भाडेतत्वावर हा कारखाना घेतला असून त्यांच्या मतानुसार हा कारखाना छोटा असून गाळप क्षमता होणार नाही परंतु सिंदखेडराजातील शेतकऱ्यांनसाठी वरदान ठरलेले संतचोखामेळा प्रकल्प च्या आधारे येथील शेतकरी ऊस उत्पादन घेऊ शकतो सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून हा कारखाना मी भाडेतत्वावर घेतला असून गाळप सुरु झाल्यावर प्रतिटन ११२ रुपये राज्य सरकारकडे जमा करावे लागतील असे त्यानी सांगितले पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी वारंवार कारखान्याचा प्रश्न मार्गी धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष शरद पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी धरून ठेवली होती,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांनी सांगितले यांच्यामुळे मी हा कारखाना भाडेतत्वावर घेतला आणि लवकरच पूजन करून गाळप सुरु शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन येणाऱ्या सर्व अडचणीवर मात करून कारखाना लवकरच सुरु करू असे मातृतीर्थचे प्रतिनिधी सचिन मांटे यांच्या सोबत फोनवर प्रतिक्रिया दिली