राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किनगाव राजा पंचायत समिती विभाग प्रमुख पदी युवानेते सचिन मांटे यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किनगाव राजा पंचायत समिती विभाग प्रमुख पदी युवानेते सचिन मांटे यांची नियुक्ती
किनगाव राजा
१७/०९/२०२२
किनगाव राजा:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किनगावराजा पंचायत समिती विभाग प्रमुख पदी सचिन मांटे,यांची १५ सप्टेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष सतीश काळे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील प्रांतउपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी पत्राद्वारे केली आहे. बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. किनगावराजा नवनियुक्त पंचायत समिती विभाग प्रमुख सचिन मांटे यावेळी त्यांनी सांगितले की सिंदखेड राजा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गाव तिथे शाखा स्थापन करणाऱ्यावर भर देणार आहे, तसेच आपल्या आक्रमक शैलीतून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वर आवाज उठवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. त्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किनगावराजा पंचायत समिती विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार व माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲ.नाझेर काझी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
