सिंदखेडराजा(प्रतिनिधी.सचिन मांटे) गुलाब चक्रीवादळ मुळे सिंदखेडराजा तालुक्यात पावसाचा कहर जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरु आहे यातच संतचोखामेळा प्रकल्प त्याचा विसर्ग पूर्णा मध्ये असतांना त्यातच पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला या पाण्यामुळे व पावसाची सतत धार मुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
तालुक्यातील पूर्णाशेजारील गाव साठेगाव,हिवरखेड पूर्णा,राहेरी, या गावा शेजारील शेतात पुराचे पाणी गेल्याने हातात येणारे पिक सोयाबीन, कपाशी,वाहून गेले आहे, तसेंच ऊसाचें प्रचंड नुकसान झाले आहे,शेताची अवजारे,सोलर पम्प,विदयुत मोटार,राहेरी येथील शेतकरी पोल्ट्री फार्म,गुरांचे गोठे,असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे राहेरी,हिवरखेड पूर्णा येथे १००% नुकसान झाले आहे व नागरिकांनकडून पुनर्वसन करण्याची मागणी केली जात आहे तालुक्यातील इतर गावात नुकसान झाले आहे.तालुक्यात या अगोदरच शेतकऱ्यांवर दुबारपेरणी चे संकट येऊन गेले त्यातच पुन्हा एकदा अस्मानी संकटाना तोंड द्यावे लागत आहे.