समृध्दी महामार्गामुळे साचलेल्या दुषीत पाण्याचा प्रवाह मोकळा करा तहसिलदारांना गावकर्यांची निवेदन देवून मागणी
समृध्दी महामार्गामुळे साचलेल्या दुषीत पाण्याचा प्रवाह मोकळा करा तहसिलदारांना गावकर्यांची निवेदन देवून मागणी
(सचिन मांटे)
सिंदखेडराजा:-
खडक पुर्णा नदीवरील समृध्दी महामार्गाच्या पुलाच्या लगत अवैध मुरूम टाकुन नदीच्या पाण्याचा प्रवाह अडविलेला आहे त्यामुळे पावसाने साचलेले दुषीत पाणी तळेगांव पासून ते निमगांव वायाळ गांवापर्यंत गेलेले अजून हे साचलेले दुषीत पाणी या गावांना सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीमध्ये गेलेले आहे त्यामुळे गावामध्ये साथीचे रोप पसरले आहेत.त्यामुळे सदर टाकलेला मुरुम तात्काळ काढून घ्यावा असे निवेदन काल दि १३ जुलै रोजी हिवरखेड पुर्णा सरपंच सदस्य व गावकऱ्यांनी तहसिलदार यांना देवून मागणी केली
निवेदनात नमूद आहे की, सदर नदी पात्राच्या पलीकडे ये जा करणारे शेतकरी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लक्ष्मण तुकाराम वाघमारे पाण्यामध्ये बुडाले होते ह्या प्रकारच्या घटना या नंतरही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच नदी काठच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते साचलेले पाणी जाऊन त्यांचे सर्व पिक नाश पावण्याची दाट शक्यता आहे याबाबत अनेकदा लेखी तक्रारी करूनही अद्याप कारवाई झाली नाही
सद्या अख्या महाराष्ट्रामध्ये महापुर सदृश परिच्छिती असतांना सुध्दा या नदीलाही पुर येवू शकतो साचलेल्या पाण्यामुळे कोणत्याही क्षणी जुन्या गांवठाणामध्ये पाणी शिरुण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे जनतेचा जिव धोक्यात आहे असे असतात स्वार्थापोटी (हिमांशु पाटील उपअभियंता एम.एस.आर.डी.सी.) हे जनहिताचा/शेतकऱ्याचा विचार न करता अर्जाचा कोणताच विचार करत नाही. या कारणास्तव गावातील काविळ व टाईफाईड या रोगाने ग्रस्त असलेले नागरीक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व गाकरी व महीला यांच्या अदोलन करावे लागेल त्यामुळे या रास्त मागणी ची त्वरीत दखल घेवून सदर नदी पात्रातील मुरूम काढून घ्यावा या निवेदणावर सरपंच सुनील गोरे, ग्रा प सदस्य गणेश नागरे,भगवान नागरे,पार्वती दहेकर,सरस्वती काकडे,केशव भुसारी सह असंख्य ग्रामस्थांच्या सह आहेत