🏆🏅🏆🏅🏆🏅🏆🏅🏆🏅🏆
प्रा.एस.आर.वाघ सर यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित…
सिंदखेड राजा –
मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड येथे कार्यरत असलेले क्रीडा व शिक्षण क्षेत्रात तन-मन-धन अर्पून उत्तम शैक्षणिक कार्य करणारे जेष्ठ प्रा.सर्जेराव वाघ सर यांना दिनांक 23 जून रोजी क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिक यांचे द्वारे दिला जाणारा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र ऑलॉम्पियन मा.श्री.अशोक ध्यानचंद यांचे हस्ते सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
प्रा.वाघ सर यांनी त्यांच्या पंचावन्न वर्षाचे सेवाकार्य करतांना शेकडो विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे देऊन दुसरबीड व नारायणराव नागरे महाविद्यालयाचे नाव जिल्हा,विभाग,राज्य पातळीवर व राज्याबाहेर झळकवले आहे.हजारो विध्यार्थी आज सरांच्या अथक परिश्रमाने आणि अचूक व निरंतर मार्गदर्शनाने स्वतःच्या पायावर उभे राहून समाजत अभिमानाने व ताठ मानेने वावरत आहेत.याचे श्रेय हे सर्व विद्यार्थी प्रा.वाघ सरांना व महाविद्यालयाला देत आहेत.
या पुरस्काराचे वितरण मा.श्री.अशोक ध्यानचंद व मा.श्री.जलालूद्दीन रिझवी यांचे हस्ते व मा.श्री.अण्णासाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.
मा.श्री.अशोक दुधारे,मा.श्री.बलवंत सिंग,मा.डॉ.उमेश राठी,मा.डॉ.संतोषी साऊळकर,मा.श्री.आनंद खरे,मा.डॉ.पांडुरंग रणमाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते….
या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल प्रा.वाघ सर यांनी क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिक यांचे आणि आतापर्यंत गेली पंचावन्न वर्षे सेवा करतांना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय तोतारामजी कायंदे साहेब,सचिव मा.शिवराज कायंदे,प्राचार्य डॉ. विजय नागरे व महाविद्यालयाचे सर्व सहकारी बंधू-भगिनी,कुटुंबीय,महाविद्यालयीन विद्यार्थी,मित्र परिवार आणि ज्यांनी-ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य,मदत केली यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून हा सन्मान या सर्वांना समर्पित केला.
🏆🏅🏆🏅🏆🏅🏆🏅🏆🏅🏆