किनगाव राजा हिवरखेड रस्त्यावर वाळूच्या टिप्परांचा सुसाट वेग.
उडत असलेल्या धुळीमुळे संतप्त महिलांनी अडविले वाहने
किनगाव राजा हिवरखेड रस्त्यावर वाळूच्या टिप्परांचा सुसाट वेग.
उडत असलेल्या धुळीमुळे संतप्त महिलांनी अडविले वाहने
किनगावराजा(सचिन मांटे) दिनांक.१९ मे,२०२२
किनगावराजा पासून नजदिकच असलेल्या हिवरखेड पूर्णा,निमगाव,येथील वाळूचे घाट सूरु आहे.पण आपला लवकर नंबर लागावा व जास्तीत जास्त ट्रिप दिवसभर कशा होतील या कडे लक्ष असते वाळू विकणारे ठेकेदार व वाळूची विक्री करणारे लहान मोठी टिप्पर धारक.यातूनच त्यांना हिवरखेड ते किनगावराजा असा मार्गक्रम करावा लागतो पण हा मार्गक्रम करतांना फक्त त्यांना आपला वेळ व पैसा दिसतो,दुचाकी व पायी चालणारा नागरिक दिसत नाही यांच्या सुसाट वेगामुळं जीवाची हानी तर होऊ शकते पण किनगावराजा रस्त्यावरील नागरिक हे टिप्पर ने उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त आहे १८ मे असाच काही प्रकार घडला संतप्त महिलांनी वाळू ची वाहतूक करणारे टिप्पर अडवून धरले व संबधित वाळूचे ठेकेदार यांना रस्त्यावर पाणी मारून देण्याची मागणी केली रस्त्यावरून उडणारी धूळ ही घरात जाऊन पिण्याचे पाणी व खाद्य खराब करत आहे आणि हा त्रास दररोजचा आहे अश्या त्रासाला कंटाळून महिलांनी रस्त्यावर येऊन वाळूची वाहने अडवली तरीही सामान्य जनतेची जान नसलेले संबंधित ठेकेदार यांनी पाणी मारणे तर दूरच उलट वाहने तशीच उभी राहू द्या अशी प्रतिक्रया दिली.आम्ही या त्रासाला कंटाळलो आहोत संबंधित ठेकेदारानी जर रस्त्यावर पाणी मारून न दिल्यास वाळूची वाहतूक बंद करू अशी प्रतिक्रिया किनगावराजा येथील महिलांनी मातृतीर्थ लाईव्ह ला बोलतांनी दिली