ठेकेदाराचा अजबच…पराक्रम चक्क तढेगाव नदीपात्रात पोकलेने वाळू उपासा.संबधी ठेकेदाराला आश्रयाचा हात कुणाचा……?
सिंदखेडराजा(सचिन मांटे).सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या काही महिन्यापूर्वी तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले त्यात प्रामुख्याने
हिवरखेडपूर्णा,तढेगाव,निमगाव,साठेगाव याठिकाणचे लिलाव बड्या बोलीने झाले नियोजित हद्द महसूल प्रशासनकडून देण्यात आली पण यातील तढेगाव येथील घाटात चक्क पोकलेन ने वाळू उपसा केला जात अशी माहिती व आपली प्रतिक्रिया राहेरी येथील शेतकरी नारायण घुगे यांनी दिली नदी पात्रात पाण्याचे कारण दाखवून पोकलेन ने वाळू उपसा केला जात असून वाळू वाहतूक करणारे डम्पर भरून दिले जातात,पोकलेन ने वाळू उपसा हा मर्यादाबाहेर होत आहे यात आमचे शेतीचे नदीत बांधलेली कडे हे ढसाळुन पडत आहे अशाप्रकारचे आमचे नुकसान होत आहे अशीच जर वाळू उपसा सुरु राहत गेला तर पाण्याचा प्रश्न उपस्थित होईल अशी प्रतिक्रिया शेतकरी नारायण घुगे यांनी मातृतीर्थ लाईव्ह ला बोलतांनी दिली,तढेगाव घाटात जर असा उपक्रम या घाटात सूरु असेल तर बाकीच्या घाटाकडे काय स्तिती असेल… नदीपात्रात पोकलेन वाळू उपसा करण्यासाठी महसूल प्रशासनाने मान्यता दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Related Posts