किनगावराजा दि.-
राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा परिपूर्ण व सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार, उद्योगांना दिलासा देणारा व सर्वसामान्यांना न्याय देणारा असे मत राष्ट्रवादीचे सचिन मांटे यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक त्यांनी म्हटले आहे की, सरकारचा अर्थसंकल्पात शेतकरी वर्गाकडे विशेष लक्ष दिले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रूपयांची अनुदानाची घोषणा केली. शेततळ्यासाठी वाढीव 25 हजार रुपये अनुदान, भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 934 कोटी रुपयाची कर्जमाफी, महिला शेतकऱ्यांना वाढीव 20% अनुदान, त्याचप्रमाणे प्रत्येकी 250 कोटी रुपये महाज्योती, सारथी आणि बार्टी या संस्थांना उपलब्ध करून दिले आहेत. याचा फायदा निश्चितपणे समाजातील सर्व घटकांना होणार आहे.