Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

काळ्याबाजारात जाणारा राशनचा तांदूळ करणवाडी चेक पोस्टवर पोलिसांनी पकडला…

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी – जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या करणवाडी चेक पोस्टवर दिनांक 31 मे रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान पिंपळगाव काळे गावावरून करणवाडी चेक पोस्ट कडे येणाऱ्या बोलेरो पिकप गाडी क्रमांक MH- 18 AA5936 ही गाडी आली असता सदर गाडी नायक पोलीस कॉन्स्टेबल प्रधान पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल किरण वानखेडे हे तिथे ड्युटी करत असताना त्यांनी सदर पिकप गाडी थांबवली त्यामध्ये दोन व्यक्ती होते त्यापैकी चालक यांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव रामेश्वर वानखडे वय 39 राहणार आंबेडकर शाळेजवळ जळगाव जामोद असे सांगितले त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनोहरसिंग राजपूत वय 47 वर्ष राहणार बाहेरपूरा जळगाव जामोद असे सांगितले त्यांना गाडी मध्ये काय आहे असे विचारणा केली असता मनोहर सिंग यांनी किराणामाल असल्याचे सांगितले व नंतर गहू व तांदूळ असल्याचे सांगितले माल कोणाचा आहे असे विचारले असता मनोहर सिंह राजपूत यांनी त्याचा मालक असल्याचे सांगितले. त्याला पावती ची विचारणा केली असता त्याने पावती नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याला आणखी विचारपूस केली असता त्यामध्ये सर्व तांदूळ असल्याचे समजले त्यामुळे सदर तांदूळ हा सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीअंतर्गत वितरित होणारा असल्याचा संशय आल्याने सदर बोलेरो पिकप गाडी हि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांना माहिती देऊन जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणली.

tandul

पंच यांना बोलावून पंचांसमक्ष मालाचा पंचनामा केला असता सदर गाडी मध्ये एकूण 48 पोतड्या अंदाजे 24 क्विंटल तांदूळ किंमत 35000 रुपये मिळून आला सदर तांदूळ पंचांसमक्ष खाली उतरून पोलीस स्टेशनच्या हेड मोहर कक्षामध्ये ठेवला जळगाव जामोद पोलीस यांचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना सदर माल हा सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीअंतर्गत होणार आहे किंवा कसे याचा अभिप्राय मिळवण्यासाठी जावक क्रमांक 1205/2021 नुसार पाठविण्यात आले होते त्यानुसार तहसीलदार यांनी निरीक्षण अधिकारी जळगाव जामोद पि.टी.वराडे हे पोलिस स्टेशनला आले व त्यांनी सदर तांदुळाची पाहणी केली असता तांदूळ मिळून आलेल्या व्यक्ती मनोहर सिंग राजपूत यांचा जबाब घेतला व त्यांनी तहसीलदार यांना सदर कांदा बाबत अभिप्राय दिला की सदर मिळून आलेला तांदूळ हा सार्वजनिक वितरण व्यवस्था प्राणी अंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या तांदळासारखा असल्याचे प्रथम दर्शनी रहे नसल्याने वाहनातील तांदूळ संबंधित आसू पूर्ण करता सदर तांदूळ जप्त करावा व आपल्या स्तरावर प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त करून घ्यावा असा अभिप्राय दिला व सोबत त्यांनी मनोहरसिंग राजपूत यांनी दिलेला जबाबाची प्रत सुद्धा पाठवली तहसीलदार व निरीक्षण अधिकारी जळगाव जामोद या दोघांनी पाठवलेले अहवालावरून मनोहर सिंग राजपूत याच्या जबाबावरून असे निदर्शनास आले की मनोहर सिंग राजपूत व रामेश्वर वानखडे या दोघांनी संगणमत करून सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीअंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या 48 पोतड्या अंदाजे 24 क्विंटल तांदूळ किंमत 35 हजार रुपये व बोलेरो पिकप गाडी असा एकूण तीन लाख रुपये चा माल जप्त करण्यात आला. सदर तांदूळ गरीब लोकांचा उदरनिर्वाह चालवावा म्हणून कमी किमतीमध्ये गरिबांना दिल्या जातो. परंतु मनोहर सिंग राजपूत हे लोकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तांदूळ विकत घेऊन त्याचा काळाबाजार करून स्वतःच्या आर्थिक फायदा करिता मार्केटमध्ये जास्त रूपयामध्ये विक्री करण्याकरिता मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध कलम 3,7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अनुसार दिनांक 9 जून रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.