जाफ्राबाद (सिध्देश्वर जाधव) – वाळूमाफियांची आता हंदच पार झालीय, जाफ्राबाद तालुक्यातील पत्रकार श्री. ज्ञानेश्वर पाबळे ऊर्फ माऊली हाडाचे पत्रकार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घडणा घडली.
वाळूच्या बातम्या का छापतो असे म्हणून माऊली पाबळे यांच्यावर अवैध वाळू उपसा करण्यांनी जीवघेणा हल्ला केलाय.
माऊली नावाने प्रसिद्ध असले हाडाचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या औरंगाबादमधील खाजगी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहे.
जाफ्राबाद तालुक्यात वाळू माफियांची मुजोरी केव्हा पर्यंत चालतेय हा प्रश्नच? प्रशासन यावर केव्हा लक्ष केंद्रित करणार?
या अशा घडणांनमुळे एकप्रकारे वाळूमाफियांना प्रोत्साहन मिळतेय ; तर यावर आवाज उडवणारांना धमक्या, हल्ला असे घडत आहे.
लोकशाहीत बोलण्याचा हक्क पत्रकाराकडून हिसकावून घेण्याचा प्रकार जाफ्राबाद तालुक्यात घडला.
यावर प्रशासन काय खबरदारी घेते यावर आता सर्वांचे लक्ष आहे.