चिखली – आपल्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटने द्वारे आपल्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 4 जुलै रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले, त्यामध्ये राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना द्वारा सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फुड प्रोग्राम अंतर्गत ४४०/- रू. प्रति क्विंटल कमीशन देण्यात यावे. किंवा दरमहा ५०,०००/- रू. निश्चित मानधन घोषित करावे. फक्त गहू, तांदूळ अंत्योदय कार्डधारकांना साखर या खाद्य पदार्थावर १ किलो प्रति क्विंटल हॅण्डलिंग लॉस(तूट) देण्यावर सर्व राज्यांनी तात्काळ निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी,
सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानांवर गहू, तांदुळ व्यतिरिक्त खाद्यतेल व दाळी दरमहा देण्यात याव्यात., एल.पी.जी. गॅसच्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यात कंपनीच्या वितरकांकडून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच्या दुकानाअंतर्गत रेशन कार्डवर असलेल्या एल. पी. जी. गॅस सिलेंडरची विक्री नोंदणी करण्याची परवानगी देऊन त्यावर निश्चित कमीशन ठरविण्यात यावे.
तांदूळ, गव्हाच्या गोण्या भरतांना ज्यूटच्या बारदानमध्ये भरून देण्याबाबत व प्लास्टिकच्या गोण्या बंद करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश काढून भारतीय खाद्य निगमला निर्देशीत करावे. कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या कुटुंबाला ठराविक स्वरूपात मदत देश •पातळीवर घोषित करून त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे. , केंद्र सरकारने वाढविलेले २० रू. व ३७ रू. कमीशनची रक्कम सर्व राज्य सरकारने तात्काळ अंमलात आणावी., पुर्ण देशभरात ग्रामीण क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांना डायरेक्ट प्रोक्रुमेंट एजंट म्हणजेच सरकार द्वारा गहू, तांदूळ, भरड धान्य खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या.
माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे , मा. पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांचे स्विय सहायक श्री संतोष राव लोखंडे,
आमदार सौ. श्वेताताई महाले यांचे वडील श्री अंकुशराव पडघाननंदु क-हाडे , पत्रकार संघाचे अध्यक्ष उद्धव थुट्टे पाटील, बाजार समीतीचे माजी संचालक भारत म्हस्के तहसीलदार डॉ अजितकुमार येळे, कृष्णा मिसाळ तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस, आदी मान्यवरांनी सदर आंदोलनाला भेटी दिल्या.
या आंदोलनात जेष्ठ नेते मोहन जाधव जिल्हा सचिव स्वस्त धान्य दुकानदार संघटना, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजीव जावळे, सतीश दुकानदार तालुका सचिव, ज्ञानेश्वर खेडेकर, आर एस घुबे , एस.बी घुबे, पांडुरंग पांडे, रविंद्र भुसारी, रुपेश चिंचोले, विकास पांडे, लेंडे, नितीन लाहूडकर, राम हेलगे, ए.टी. बाहेकर, भुसारी, मिसाळ, शेटे, इत्यादी जवळपास १५० दुकानदार संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.