तुमच्या कडून काय होते करून घ्या माझे कोणीही काहीही वाकड करू शकत नाही , माझ्ये वरपर्यंत सबंध आहे – राशनदादागिरी
बुलढाणा ( मातृतीर्थ लाईव्ह वृत्त ) – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सायळा येथे राशन दादागिरी गावातील काही राशनधारक राशन आणण्यासाठी गावातील राशनदुकानात गेले असता राशनदुकानदार यांना गावातील राशनधारकांनी राशनवाटपाची पावती मागितल्याने राशन दुकानदार गावकऱ्यांवर भडकला व तुमच्या कडून काय होते.करून घ्या माझे कोणीही काहीही वाकड करू शकत नाही , माझ्ये वर पर्यंत सबंध आहे , तुम्हाला काय करायचे करा , असे दादागिरीच्या भाषेत राशन दुकानदार राशनधारकांना बोलत होता . तसेच गावातील शत्रूगुण लंबे यांना तर तुझे राशन कार्ड यादी मधूनच नाव काढून टाकतो व तुझे राशनकार्ड स्थलांतर करतो अशी धमकी शासनमान्य परवानाधारक यांनी दिली व केंद्रयेथील राशन दुकानदारांची शासनाच्या वतीने मोफत धान्यवाटप योजना सुरू करण्यात आले असून गोरगरिबांना मोफत राशन वाटप करण्यात आले . परंतु सायळा येथील परवानाधारक मोफत राशन वाटप करण्याऐवजी गोरगरिबां कडून अधिकचे पैसे घेऊन राशन वाटप करत असतात . त्यांना जाब विचारला असता माझ्या नादाला लागू नका नाही तर तुम् हाला यानंतर राशन देणार नाही , अशी धमकी सुद्धा गरिबांना देत होता .
सदर शासनमान्य परवानाधारक दुकानदार हा सायळा गावात राहत नसुन मेहकर याठिकाणी वास्तव्यात असतो . सायळा येथील रेशन वाटप हा दुकानदार महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात गावात येऊन करतो . कुठल्याही प्रकारची पुर्वसुचना न देता रेशन वाटपाला सुरूवात करून जर दोन दिवसांत रेशन घेतले नाही तर उर्वरित व्यक्तीनां राशन देत नाही सदर व्यक्ती मेहकर येथून शेवटच्या दोनदिवसात येवून ते पण सकाळी गावात न येता गावात दुपारी रेशन वाटप करत असतो . त्यामुळे गावात बरेच रेशन कार्ड धारक हजर नसतात . त्यामुळे जे हजर नाही त्यांना परवाना धारक दुकानदार राशन देत नाही उर्वरित राशन मार्केट मध्ये नेऊन विकत असल्याची बाब समोर आली आहे . याप्रकाराची माहिती मिळताच सरपंचपती संदीप लंबे पाटील यांनी तहसीलदार साहेब यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला घडलेला सर्व प्रकार तहसीलदार साहेब यांना सांगितला व या अगोदर तहसीलदार साहेब यांना वारंवार निवेदन सुध्दा सरपंच व गावर्कयांच्या वतीने देण्यात आले आहे परंतु यावर कुठल्याच प्रका रची कारवाई न झाल्याने गावातील गावकऱ्यांनी आज रूद्र रूप धारण केले होते . सदर परवानाधारकाचा परवाना रद्द करून चौकशी करावी , अशी ओरड गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती . सरपंच संदीप लंबे पाटील यांनी तहसील कार्यालयात संपर्क केला असता तहसील कार्यालयातून राशनपरवाना धारकांची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदार मुजोवर मॅडम व पुरवठा अधिकारी बंगाळे साहेब यांनी भेट देऊन शासनमान्य रेशन दुकानाची पाहणी करून चौकशी केली . परंतु गावातील अनेकांच्या समस्या असल्याकारणाने नायब तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांनी घरोघरी जाऊन गावकऱ्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात घेतल्या असून लवकरच राशनदुकानदार या च्या वर योग्य कारवाई करण्यात येईल असे सांगितले परंतु गावकऱ्यांच्या वतीने सदर परवानाधारकाचा परवाना रद्द करावा व गावातील महिला बचत गटाला द्या , अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी यांना करण्यात आली . यावेळी गावातील सरपंच संदीप लंबे पाटील , ग्रामपंचायत सदस्य , गावकरी मोठ्या संख्येने गावातील महिला सुध्दा उपस्थित होत्या .