गजानन सोनटक्के जळगाव जा
शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी करीत असताना लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचा माल घरात पडून आहे व कोरोना महामारी अशातच कधी नव्हे ते बियाणे व खतांचे भाव वाढ झाली असून रासायनिक खताच्या किमती जवळपास दीड पटीने भाव वाढले आहेत आतापर्यंत किरकोळ पन्नास-शंभर भाव वाढ व्हायची यंदा मात्र तब्बल दीड पटीने रासायनिक खताचे भाव वाढ झाली आहे बाजारात आता जे खत आहे ते नवीन भावाचे खत येत आहे व ते भाव दीड पटीने वाढले आहेत पूर्वी 1200 रुपयाला मिळायचे आता ते 1900 रुपये नुसार मिळेल 12/ 32/ 16 / खत 1175 ला मिळायचे तेच आता 1800 ला मिळेल एवढे भाव वाढल्यावर शेतकऱ्याने शेती कशी करायची हा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे या वर्षी जुने खत नवीन भावाने लिहून शेतकऱ्यांची फसवणूक होणे ही शक्यता नाकारता येत नाही जुने खत बिलाची पावती न देता नवीन दराने विक्री करतील या करिता शेतकऱ्यांनी खताचे पक्के बिल घेतलेच पाहिजे कोरोना महामारीत शेतकरी शेतात राबराब राबून अहोरात्र अन्न पिकऊन अशा संकटाच्या वेळीही आपले योगदान देशाला देत आहे असे असताना देखील शेतकऱ्यांच्या पदरात येते तर ती फक्त निराशाच शासनाने व लोकप्रतिनिधींनी व कृषी विभागाने या वाढलेल्या रासायनिक खताच्या दरवाडी संदर्भात स्पष्टीकरण द्यावे व शेतकऱ्याला या संकटातून वाचवावे अशी संतप्त जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे