Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कापूस पिकाला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून 38 वर्षीय इसमाचा मृत्यू…

गणेश भड – जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा बुद्रुक धरणाजवळ राजुरा येथील शेतकरी भारसिंग रोड्यासिंग चंगळ वय 38 वर्ष हा आपल्या शेतामधील पराटीला पाणी देण्याकरिता शेतात गेला होता. भारसिंग यांच्या शेताजवळ रामसिंग चंगळ चे शेत आहे रामसिंग पराटी ला पाणी लावून घरी जेवण करण्याकरता गेला होता रामसिंग घरून जेवण करून आला असता त्याच्या शेजारी असलेल्या भारसिंग चंगळ याच्या शेतामध्ये इलेक्ट्रिक पेटीजवळ भारसिंग पडलेला दिसला असता तसेच रामसिंग पळत पळत भारसिंग पडुन होता त्या ठिकाणी गेला असता,रामसिंग ने त्याला हलवून बघितले असता भारसिंग मरण पावला होता.

rajura

तसेच रामसिंग हा भारसिंग च्या घरी जाऊन शेतात भारसिंग ला विद्युत शॉक लागला व तो मरण पावला आहे अशी माहिती त्याने कोतवाल चंगळला सांगितली कोतवाल चंगळणे शेजारीलच लोहारसिंग व जायमल चंगळला सांगितले येथे गेले असता भारसिंग त्यांना मरण पावलेला दिसला अशा आशयाची फिर्याद नरसिंग चंगळ यांने जळगाव पोलीस स्टेशनला दिली असता. घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला व मृतदेह जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्याकरिता पाठवण्यात आला होता. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.