सिंदखेडराजा:- टीम एकलव्यच्या माध्यमातून विविध ठिकाणी शैक्षणिक व सामाजिक काम केले. तो अनुभव व घेतलेले शिक्षण यातून चेवनिंग स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. विदेशात शिक्षण घेऊन, त्याचा उपयोग भारतातील विशेषतः राज्यातील उपेक्षित घटकांतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राजू केंद्रे यांनी केले आहे.आपण सारे टीम तर्फे दि. ६ जुलै, मंगळवारी तालुक्यातील दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय नागरे तर माजी आमदार तोताराम कायंदे, आत्माराम केंद्रे, जिजाबाई केंद्रे, वामनराव जाधव, मधुकर देशमुख, प्रभाकर ताठे, डॉ. शिवाजी खरात, प्राचार्य शिवराज कायंदे, जी. एस. देशमुख, टीम आपण सारेचे दीपक नागरे, विठ्ठल चव्हाण, नंदू शिंगणे, व्ही. टी. जायभाये, प्रवीण गीते, दीपक कायंदे, विनोद ठाकरे, अशोक सवडे, अशोक नागरे, गणेश डोईफोडे, देवानंद सानप, बाळू भोसले, शहजाद पठाण, राजेश कायंदे आदि प्रमुख उपस्थितीत होते.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण सारे टीम व नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या वतीने राजू केंद्रे, जिजाबाई केंद्रे, आत्माराम केंद्रे यांचा जिजाऊ प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी संवाद साधतांना राजू केंद्रे यांनी टीम एकलव्य च्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतरही राज्यात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची मीमांसा केली. त्यादरम्यान आलेल्या विविध अनुभवातून शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची गरज लक्षात आल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थी, पालक व उपस्थित शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रश्नांची सविस्तरपणे उकल केली.माजी आमदार तोताराम कायंदे यांनी मार्गदर्शन करताना राजू केंद्रे यांच्या संघर्षाचे विवेचन व कौतुक केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. विजय नागरे यांनी संस्थाध्यक्ष तोताराम कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी केंद्रे यांच्या एकलव्य टीमला मदत करण्याचे अभिवचन दिले.
याप्रसंगी कवी विशाल इंगोले यांची मराठी विश्वकोश महामंडळाच्या राज्य सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक नागरे, प्रास्ताविक विठ्ठल चव्हाण, आभार प्रदर्शन विनोद ठाकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी गजानन मुंढे, शिवा बुधवत, अनिल गायकवाड, अनिल रणमळे, शेख युनूस, मिलिंद गवई, हेमंत गीते, अनिल देशमुख, ऋषिकेश झोरे, मयूर घुगे, वेद नागरे आदिंनी परिश्रम घेतले.