शिवशंभू अर्बनच्या अध्यक्षपदी राजीव जावळे यांची फेरनिवड
अतिशय कमी कालावधी आपल्या ग्राहक सेवा केंद्रीत कार्यप्रणाली व सेवाभावी वृत्ती मुळे नावलौकिक कमावलेल्या शिवशंभू अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चिखली च्या अध्यक्षपदी राजीव भगवानराव जावळे यांची सर्वानुमते अविरोध निवड झाली आहे.
शिवशंभू अर्बन च्या 2022 ते 2027 च्या कालावधीसाठी नियोजित संचालक मंडळाची निवड 21/11/2022 रोजी अविरोध झाल्याचे सहाय्यक निबंधक कार्यालय चिखली यांनी जाहीर केले.
त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी संदर्भातील कार्यक्रम जाहीर झाला त्यानुसार आज दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी शिवशंभू अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालीलप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकांची अविरोध निवड झाली आहे
श्री राजीव भगवानराव जावळे – अध्यक्ष
श्री जानराव पाटील नागवे – उपाध्यक्ष
सौ. वंदना संजय नागवे पाटील – सचिव
संचालक
सौ माधुरी राजीव जावळे
सौ वैशाली शिवाजी नागवे (दानवे)
श्री शिवप्रसाद राऊत
श्री शेषराव सिरसाठ
श्री विजय सोनुने
श्री राजेंद्र सपकाळ
श्री वासुदेव शेगोकार
निवडणूकी दरम्यान शिवप्रसाद राऊत यांनी राजीव जावळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले तर राजेंद्र सपकाळ यांनी सदर सूचनेला अनुमोदन दिले तसेच श्री जानराव पाटील नागवे यांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री राजीव जावळे यांनी सुचवले तर संचालक शिवप्रसाद राऊत यांनी सदर सुचलेनेला अनुमोदन दिले.
अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी एक एकच अर्ज दाखल झाल्याने राजीव जावळे यांची अध्यक्षपदी तर जानराव पाटील नागवे यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याचे
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री राजेंद्र काळे सहायक निबंधक कार्यालय चिखली यांनी जाहीर केले.
शिवशंभू अर्बन ची स्थापना सन 2020-21 मधील असून वर्षभरामध्येच राजीव जावळे यांचे नेतृत्वाखाली संस्थेने 4 करोड रुपये ठेवींचा टप्पा पार केला आहे. स्वच्छ प्रतिमा व पारदर्शक व्यवहारांच्या जोरावर कुठलीही पिढीजात पार्श्वभूमी नसतांनाही शिवशंभू अर्बन च्या संपूर्ण टिमने कमी कालावधीत आपल्या भागधारकांचा, गुंतवणूकदारांचा आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
याप्रसंगी उपस्थित भागधारकांनी नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.