नांदुरा शासकीय कोविड रुग्णालयाला अत्यावश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- आमदार राजेश एकडे
नांदुरा शहर व तालुक्यातील रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी,नांदुरा डी.सी.एच.सी.ला अत्यावश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी सूचना आमदार श्री.राजेश एकडे यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाने केली आहे. आमदार श्री. राजशे एकडे यांच्या सूचनेनुसार दिनांक २० मे २०२१ रोजी अप्पर जिल्हाधिकारी श्री.धनंजय गोगटे व जिल्हा शल्यचिकित्सक श्री.प्रशांत पाटील आमदार श्री.राजेश एकडे यांच्यासह नांदुरा कोविड सेंटरची पाहणी करून आढावा घेतला.आमदार राजेश एकडे यांच्या पाठपुराव्याने नांदुरा कोविड सेंटर ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रमा केअर मध्ये सुरू असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिनस्त राहणार आहे.नांदुरा कोविड सेंटर चे रूपांतर डी.सी.एच. सी.मध्ये होणार आहे,डी.सी.एच.सी.च्या नॉम्स नुसार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असणार आहे.

५० बेड च्या डी.सी.एच.सी. मध्ये आता ३० ऑक्सिजन बेड करण्यात येतील व त्या साठी आवश्यक ऑक्सिजन सेंटर पाईप लाईन तात्काळ बसविण्यात येईल, मुबलक औषध साठा देखील उपलब्ध राहणार आहे.आमदार श्री.राजेश एकडे यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्याने नांदुरा शासकीय डी.सी.एच.सी.सेंटर सुरू होत आहे.आमदार श्री राजेश एकडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाने डी.सी.एच.सी.सेंटरला १० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून दिले असून स्थानिक विकास निधी(आमदार निधी) अंतर्गत आणखी १० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध होणार आहेत.
यावेळी मलकापूर येथील उपविभागीय महसूल अधिकारी श्री.मनोज देशमुख, तहसीलदार श्री.राहुल तायडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे,डॉ.चेतन बेंडे, डॉ.एल.जैस्वाल,नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.गोपुसेठ बरालीय, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे, नांदुरा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर डामरे प्रामुख्याने उपस्थित होते.