सिंदखेडराजा दि.२२(प्रतिनिधी) स्वराज्यप्रेरक माँ जिजाऊंचे पिता सेनापती राजे लखुजीराव जाधव व त्यांचे ३ पुत्र व नातू यशवंतराव यांच्या ३९४ व्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात येणार असून मातृतीर्थ सिंदखेडराजा परिसरातील आडगावराजा,किनगावराजा, देऊळगावराजा मेहूनाराजा, उमरद व जवळखेड येथील राजे लखुजीरावांच्या वंशजांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्मृती दिनानिमित्त दिनांक २५ जुलै मंगळवारी सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान लखुजीराजे तसेच त्यांचे ३ पुत्र व नातू यांच्या समाधीस्थळाचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे,माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर,सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष सतीश तायडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.नाझेर काझी,शिवसेना नेते देविदास ठाकरे,डॉ.रामप्रसाद शेळके,छगन मेहेत्रे,
उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड,तहसीलदार,सचिन जैस्वाल,गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेनीकर,सिंदखेडराजा पोलीस निरीक्षक केशवराव वाघ,युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव,सिंदखेडराजा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश काळे,शिवसेना तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सीताराम चौधरी आदी मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती राहणार असून समाधी पूजन झाल्यानंतर जिजाऊ सृष्टीवर शिवव्याख्याते उद्धव शेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा व भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्मृतिदिन कार्यक्रमास शिव व जिजाऊ भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन लखुजीराजे वंशजांच्या वतीने तसेच यदुकुलभूषण राजे लखुजीराव जाधव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.