अमोल भट ( ९९७०७४४५५४ ) – राहुल गांधी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते कश्मीर काढणार हे निश्चित झाल्यापासून या यात्रेची व राहुल गांधींची हेटाळणी करून या यात्रेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले . आणि नेहमीप्रमाणे मीडियाने एकमताने ठरविल्यानुसार या यात्रेस प्रसार आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवले . अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन ज्या मीडियाने जगभर क्षणाक्षणाची बातमी देऊन जगभरात तर पसरवले व त्याच बरोबर सरकार विरोधी वातावरण बनविण्यात देखील तेवढाच पुढाकार घेतला. कदाचित या यात्रेस राष्ट्रीय मीडिया याच कारणाने दूर राहिला किंवा ठेवला असावा अशी शंका येते !
जे मीडिया दाखवत नाही तेच तर अनुभवायचं होत .
अलीकडील काळात काँग्रेस पक्ष रणनीती बनवण्यात सफल होत नव्हता आणि त्यांच्या प्रत्येक रणनीती भाजप तोडीस तोड मात देत असे , परंतु भारत जोडो यात्रा दक्षिण ते उत्तर सुरू करून आणि “नफरत छोडो… देश जोडो ” सारखी घोषणा घेऊन जी रणनीती बनवली त्यास भाजपला महाराष्ट्र पार करेपर्यंत तरी यश आले नाही राहुल गांधी बोलण्यात चुकतात का ? कोणाबरोबर हातात हात घेऊन चालतात , ते चार किलोमीटर ही चालू शकणार नाही ,देश कुठे तुटला ? म्हणून त्यास जोडण्यास निघाले अशा अनेक मुद्द्यांवर प्रयत्न करूनही भारत जोडो यात्रेचा झंजावात थांबवता आला नाही . न विचलित करता आला ,
महाराष्ट्रात यात्रा येण्यापूर्वीच नांदेडचे अशोकराव चव्हाण , लातूरचे देशमुख बंधू , सांगलीचे विश्वजीत कदम काँग्रेसमध्ये नाराज आहे व पक्ष सोडणार अशा बातम्या येऊ लागल्या यात्रा महाराष्ट्रात आली व काँग्रेस मजबुतीने एकसंघ पणे उभी राहिली नांदेड मधील यात्रेचे स्वागत ते शेगाव ची सभा सगळंच अंदाजापेक्षा जास्त जनसमर्थन मिळू शकलं ही यात्रा जनमानसात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचत असल्यामुळे ती प्रत्यक्ष अनुभवाची होती . यात्रेत सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते , निर्भीडपणे लिहिणारे , सोशल मीडियावर बोलणारे पत्रकार स्वयंस्फूर्तीने यात्रे समर्थन देऊन चालत होते . यात्रेस पन्नाशीचे पुढील लोकांचा सहभाग प्रकर्षाने जाणवत होता . शेगाव चे श्री गजानन महाराज संस्थान मध्ये दर्शनापासून प्रसाद घेण्यापर्यंत राहुल गांधी यांच्या मधील साधेपणा सर्वांना भावून गेला .
सभेसाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती . मंचावर राहुल गांधी यांचे आगमन झाले तेव्हा तरुणाईचा झालेला जल्लोष , सभेत राहुल गांधींनी कमी वेळाचे भाषण करून भारत जोडो यात्रा का व मुद्देसूद परंतु लांबलचक व रटाळ भाषण न करता व भाषणात भांडणा सारखे उणेदुणे यावरही बोलणे टाळले. राहुल गांधी एक संयमी , मेहनती व परिपक्व राजकारणी झाले तेही गांधी नेहरू यांच्या मार्गावर चालून हे उपस्थित जनसमुदायाच्या उत्साह मुले अधोरेखित झाले .
भारत यात्रा पाई असल्यामुळे राज्या-राज्यातील , गावखेड्यातील सामान्य माणसाशी राहुल गांधींना जुडता आले ,त्यांचे प्रश्न जवळून अनुभवता आले आणि काँग्रेस पक्षाची मरगळ झटकून सामान्य कार्यकर्त्यांमधील जिवंत असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली . तो आला …. त्याने जिंकले ….. तेच तर अनुभवायचे होते . सत्तेच्या विरोधात , हिंसेच्या विरोधात , संविधान विरोधी शक्तीच्या विरोधात लढण्यास आपण एकटे नाही आपल्यासारखे अनेक आहे हा अनुभव सुखावून गेला आणि काळ रात्री आशेच्या मशाली पेटल्या. काळोखही दूर होतानाचा आशावाद वाढला बाकी काँग्रेस संपली म्हणणारे निवडणूक जिंकण्याचे तंत्र खोटा प्रचार द्वेष जास्त काळ चालवू शकणार नाही हेच मंचावरील एका गीतातून जाणवलं
“मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची , तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची .
हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला , अर काटंकुटं वाट मंधी बोचती त्याला .
रगत निघल तरीबी हसल शाब्बासकीची , तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची
…. पर्वा बी कुनाची.