किनगावराजा – (प्रतिनिधी सचिन मांटे,) दि.२७ मे २०२२.”वृक्षवल्ली आम्हा सोयरे,, वल्ली वनचरें ।
हा अभंग तुकाराम महाराजांनी वृक्ष वल्ली यांच्या पासून आपल्याला खुप फायदे आहेत, म्हणून तेच आपले सगे सोयरे आहेत ही महाराजांची धारणा आहे. वनातील पशु -पक्षी हे सुध्दा पांडुरंग विठ्ठलाचे नाम स्मरण करीत आहे, असे अभंगातुन सांगत आहे. आपले या वनाशी खर तर नातंच आहे.पण किनगावराजा परिसरात अवतारला पुष्पराज,पुष्पराज चित्रपटाचे अवलोकन करून किनगावराजा परिसरात चंदन तस्कर सक्रिय झाला आहे .
चंदन तस्कर हा चंदनाचा गाभा घेऊन जात आहे पण एक म्हणी प्रमाणे ‘ऊस गोड लागला म्हणुन मुळासगट खात नसते’ अशा प्रकारे काही ठिकाणहुन झाडे पळवत आहेत तर काही ठिकाणी गिरमिट नावाच्या शस्राने चंदनचा गाभा घेऊन जात.बाजारात चंदनाची खूप मागणी आहे चंदनापासून सुगंधी द्रव्ये,सुवासिक असे पदार्थ बनविले जातात व चढ्या दामाने त्याची विक्री केली जाते या पुष्पराजच्या तस्करीला ला आळा घातला जाईल का ? कि इतर वृक्षासारखे चंदन पण नामशेष होईल असा प्रश्न निर्माण होत आहे.