देऊळगाव राजा : दि.8 संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व १९ दरवाजे आज ०.५० मीटर ने उघडण्यात आले खडकपूर्णा प्रकल्प ओसांडून वाहत असल्याने यावर्षी प्रथमच प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले असून हा विहंगम दृश्य बघण्याकरता नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्या साठी महत्वकांक्षी ठरलेला संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्प ओसांडून वाहत आहे यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच प्रकल्पाचे सर्व 19 दरवाजे 0.5 मीटर ने उघडण्यात आले आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन सिल्लोड जाफराबाद तालुक्यात अलीकडील काही दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे
दरम्यान खडकपूर्णा पूरनियंत्रण कक्षाद्वारे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे येत्या काही दिवसात पाण्याची आवक पाहून प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त प्रमाणात बंद किंवा उघडली जातील अशी माहिती बुलढाणा पाटबंधारे विभागचे श्री तिरमारे यांनी दिली आहे सर्व दरवाजे उघडण्यात आल्या ने प्रकल्प भोवती निसर्गरम्य विहंगम दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मुलाबाळांसह चोखा सागराच्या पायथ्याशी गर्दी केली आहे.