जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राना सुरू करण्याची परवानगी द्या! प्रशांत डिक्कर.
संग्रामपुर : (ता.प्र.) खरिप -२१ हंगाम तोंडावर आला आहे. दरवर्षी साला प्रमाणे शेतकरी १५ मे पासून बागायती कपासाची लागवड सुरू होत आहे.व अनेक भागात धुळ पेरणीला सुध्दा सुरुवात होत आहे. करीता शेतकऱ्यांना खते, बि बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील कृषी सेवा केद्रांना कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
या वर्षी कोरोणाची लागण वाढत असल्याने ही महामारीची परीस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने लॉकडाउन करुन कृषी केंद्र बंद ठेवण्याचा आदेश पारित केला आहे. त्यामुळे शेती पेरणीसाठी शेतकऱ्यांना खते,बि बियाणे मिळत नसल्याने केवळ प्रशासनाने अवलबंलेल्या धोरणामुळे शेतकऱ्यांनवर हे लादलेले संकट आहे. यामुळे शेतकरी पुर्णपणे त्रस्त होत आहे. करीता जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राना तत्काळ कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून शेतकरी खते,बि बियाण्याची वेळेवर खरेदी करून शेतात पेरणी करीता येईल. अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली आहे..