गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी – आज दिनांक २४ मे रोजी पणन महासंघाचे संचालक तथा एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांच्या वाढदिवसा निमित्य एल्गार संघटनेच्या वतीने नगर परिषद सांस्कृतिक भवन जळगाव जामोद येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या या महामारीत देशासह महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवड़ा असल्यामुळे एल्गार संघटनेने प्रसेनजीत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले त्याला परिसरातील प्रसेनजीत पाटिल यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने प्रचंड प्रतिसाद देत १५० लोकांनी रक्तदान केले. या रक्तदाना करिता सामान्य रुग्णालय खामगांव,सोनी रक्तपेढी खामगांव यांनी रक्त संकलन केले.यावेळी स्वाभिमानीचे नेते प्रशांत डिक्कर,राष्ट्रवादीचे नेते संदिप उगले,रंगराव देशमुख, एम.डी. साबिर,शिवसेनेचे तुकाराम काळपांडे,रमेश ताड़े,संजय भुजबळ,सामाजिक कार्यकर्ते संजय पारवे, समाजवादी पार्टीचे अजहर खान,सैय्यद नफ़िज़,एम.आय.एम चे समीर आर्यन यांच्यासह विविध राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवारांनी भेटी देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबीराच्या आयोजनाकरता विजय पोहनकर, अजहर देशमुख,आशिष वायझोड़े,सतिश तायड़े,सिद्धार्थ हेलोडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रसेनजीत पाटिल यांनी सर्व रक्त दात्यांचे व शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
Related Posts