Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्हा चालक पोलीस भरतीसाठी 28 ऑक्टोंबर रोजी उमेदवारांची कागदपत्रे तपासणी

जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस भरती 2019 जाहीराती प्रमाणे 52 व वाढीव मंजूर झालेले 8 पदे अशा एकूण 60 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेच्या कागदपत्र पडताळणी साठी 142 उमेदवारांची यादी प्रसारीत करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, बुलडाणा येथील बोर्डवर, पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथील बोर्डवर, प्रत्येक पात्र उमेदवारास त्यांचे ईमेल व मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे, www.buldhanapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांनी आपले मूळ कागदपत्रांसह व मूळ कागदपत्रांच्या दोन छायांकित प्रती तसेच 2 पासपोर्ट आकाराचे फोटो घेवून 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालय, बुलडाण येथे हजर रहावे, असे आवाहन सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांनी केले आहे.

Police
Leave A Reply

Your email address will not be published.