दुसरबीड (सचिन मांटे) – किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या येणाऱ्या हद्दीतील दुसरबीड शहरात आज गणेशउत्सव २०२१ कायदा व सुव्यवस्था संदर्भाने आज दुसरबीड शहरात पथसंचलन करण्यात आले
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-12-at-17.59.26-1024x484.jpeg)
प्रथमतःनागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते पण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, गृहरक्षक दल कर्मचारी हेल्मेट व लाठ्या घेऊन रस्त्यावर उतरले.प्रामुख्याने दुसरबीड शहरातील गणेशउत्सव प्रमुख विसर्जन मिरणूक मार्ग मुख्य बाजारपेठ,शिवाजी चौक, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, टिपू सुलतान चौक, राधाकृष्ण मंगल कार्यालयापर्यंत
बुलढाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार युवराज रबडे, पोलीस उपनिरीक्षक बनसोडे,पोलीस उपनिरीक्षक टेकाळे, 15 पोलीस अमलदार व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ३. चे २९ कर्मचारी व १२ पुरुष गृहरक्षक यांनी सहभाग घेतला.