गजानन सोनटक्के जळगाव जामोद – आज दि 20/ 7 /2021सूनगाव येथील बजरंग दल गोरक्षक यांचे कडून पोलिसस्टेशन जळगाव जा महिती मिळाली कि , एक इसम टाटा मॅक्सीमो मालवाहु गाडी क्र एम एच 27 एक्स 5412 मध्ये बैल जामोद कडून जळगाव जामोद कडे कोंबून घेवून जात आहे . त्यानुसार सहाययक पोलीस निरीक्षक सागर भास्कर खाजगी वाहनाने निघुन सुनगाव येथे पोहोचले आणी रोडवर नाकाबंदी करत हजर असता खबरीप्रमाणे एक टाटा मॅक्झीमो मालवाहू गाडी क्र एम एच 27 एक्स 5412 मध्ये काही इसम बैल घेवून येतांना दिसले
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-20-at-20.36.42.jpeg)
सदरचे वाहनाबाबत आम्ही खात्री केली व सदरचे वाहन पंचासमक्ष थांबवून त्यांची पाहणी केली असता त्यामध्ये 1.एक लालसर बैल ज्यांचे शिंगे मागे असलेले वय अंदाजे 8 वर्ष चेह – यावर बाहडा शेपटाचा गोडालाल असलेला किमती अंदाजे 6000 रूपये 2.एक पांढ – या रंगाचा बैल त्याचे शिंगे मागे असलेली क्य अंदाजे 7 वर्य शेपटाचा गोंडा काळा असलेला किमती अंदाजे 7000 रूपये3.एक पाढ – या रंगाचा बैल उभे शिंगे असलेला वय अंदाजे 7 वर्ष शेपटाचा गोंडा काळा किंमत 6000 रूपये 4.एक धामण्या रंगाचा बैल उभे शिंगे असलेला
अंदाजे 9 वर्ष शेपटाचा गोंडा काळा असलेला किंमत अंदाजे 5000 रुपये असे चार बैल त्यांना वेदना होतील अशा रितीने आणी त्यांच्या उंचीच्या आणी रंदीच्या आणी जाळीच्या मानाने पुरेसे नसलेमुळे वाजवीरीत्या हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने वाहतूक करीत होते त्यानुसार प्राण्यांनाक्रूरतेने वागविणे प्रतिबंध नुसार अप नं613 /2021 कलम 11 (1)घ /ड/ च नुसार आरोपी शेख रिहान शेख बटू वय 26 राहणार जामोद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन करीत आहे