मृतक त्र्यबंक थोरवे यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 2 लाख रु धनादेश प्रदान
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिरडव च्या वतीने मौजे पळसखेड जहाँ.येथील खातेदार त्र्यंबक संजबाराव थोरवे यांचे काही महिण्यापूर्वी सेनगाव जिंतूर मार्गावर अपघाती निधन झाले होते. त्र्यंबक थोरवे हे हिरडव येथील नितीन डोळस यांच्या कडे भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्रावर नियमित व्यवहार करत असत त्यावेळी ग्राहक सेवा केंद्र संचालक डोळस यांनी थोरवे यांना प्रधान मंत्रीजीवन ज्योती विमा योजनेची माहीती सांगून सदर योजनेअंतर्गत विमा संरक्षित करण्यात प्रोसाहित केले
थोरवे यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना समजावून घेऊन आपला विमा काढून घेतला असल्याने प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा भारतीय स्टेट बँक शाखा हिरडव शाखा व्यवस्थापक सम्राट सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक सेवा केंद्र चालक नितीन डोळस यांनी पाठपुरावा करून मृतक त्र्यंबक थोरवे यांच्या वारसांना दोन लाख रु चा धनादेश त्यांचं घरी जाऊन वडील संजबाराव महादू थोरवे याना प्रदान करण्यात आला असल्याची माहिती २७ आगस्ट रोजी देण्यात आली.यावेळी भारतीय स्टेट बँक शाखा हिरडव व्यवस्थापक सम्राट ,सहाय्यक लिपिक स्वप्नील तायडे ,ग्राहक सेवा केंद्र चालक नितीन डोळस ,संदीप ओव्हर ,प्रभाकर जउळकर, श्रीकिसन ओव्हर उपस्थित होते .